ताज्या घडामोडी

देश बातमी

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना […]

राजकारण

संजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई : शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही […]

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर

राजकारण

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. पण त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना प्रकाश […]

सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना

भाजपच्या माजी केंद्रिय मंत्र्यांची आमदारीकीसाठी वर्णी; पक्षाकडून नाव जाहीर

मनोरंजन

कंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवर एका लेखकाने चोरीचा आरोप केला आहे. मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटानंतर कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका लेखकाने कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष […]

वायरल झालं जी

भारताच्या पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाच्या मुलीला थेट मैदानातच केलं प्रपोज; व्हिडिओ पाहाच

सिडनी : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण मैदानाबाहेर एका भारतीय पठ्ठ्याने एका ऑस्ट्रलियन मुलीला प्रेक्षाक गॅलरीत प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. त्याने सर्व प्रेक्षकांत तिच्या हातात रिंगही घातली. मैदानावर भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फटकेबाजी करत असताना भारतीय चाहत्याने वेळ साधत सामना पाहण्यासाठी आलेल्या आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. महत्वाची […]

वार्तांकन करणाऱ्या बातमीदारासोबत हत्तीने केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

राग झाला अनावर तब्बल 500 दारुच्या बाटल्या फोडल्या; पाहा व्हिडीओ

कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु

अहमदनगर : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. त्यानंतर कोणालाही लसीचा दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, काल कोरोनाची लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी लस घेतल्यानंतर […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी

राहुन गेलेल्या बातम्या ...

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना दिल्लीतील कॅनॉट प्लेसचे एसीपी सिद्धार्थ जैन म्हणाले की, ''खलिस्तानी आणि अल कायदासह काही दहशतवादी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घातपाताची स्थिती निर्माण केली जाऊ शकते, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून आम्ही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यासह काही पावलं उचचली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत १५ ऑगस्ट आणि

लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे

मुंबई : भारतात कालपासून जगभरातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देशभरातील २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या येईल. असेही त्यांनी सांगितले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ''जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे. जीएनएम, नर्सेस,

संजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई : शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. तसेच शेवटी बंगाली भाषेत जय हिंद अशी घोषणाही त्यांनी केली. त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत ही माहिती सर्वांना दिली आहे. https://twitter.com/rautsanjay61/status/1350792166000345089

विराट, उमेशनंतर आणखी एक खेळाडू झाला बाप

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात सोमवारी (११ जानेवारी २०२१) चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं होतं. त्यानंतर उमेश यादवच्या चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. मुश्कात अली चषकात पंजाब संघाचं नेतृत्व करणारा मनदीप सिंह बाप झाला आहे. २९ वर्षीय मनदीपची पत्नी जगदीप जस्वाल हिनं शनिवारी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मनदीपनं ट्विटरवर याची माहिती दिली आहे. मनदीप-जगदीप जस्वाल यांनी आपल्या मुलाचं नामकरणही केलं आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव राजवीर असं ठेवलं आहे. मनदीप याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. https://twitter.com/mandeeps12/status/1350433314797088778 मनदीप सिंहनं डिसेंबर २०१६ मध्ये ब्रिटनची प्रेयसी

कंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवर एका लेखकाने चोरीचा आरोप केला आहे. मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटानंतर कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका लेखकाने कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा या सिक्वलची घोषणा केली आहे. हा चित्रपट काश्मीरमधील राणी दिद्दा यांच्या जीवनावर अवलंबून आहे. कंगनाने या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आशिष कौल यांनी कंगनावर दिद्दा : द वॉरियर क्विन ऑफ काश्मीर

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला

कल्याण : ''कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील,'' असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडीतील सेनेच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग दंडवत,” असे म्हणत दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संपादक संजय राऊत यांनी लेख लिहित कॉंग्रेसवर टीका केली. या टीकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीदेखील संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं. मात्र बाहेर काँग्रेस शिवसेनेत कितीही सामना रंगला असला, तरी ठाकरे सरकार मात्र स्थिर असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनीच

फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फुकरे या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. एक गुणी कलाकार आज आपण गमावला. ओलानोकियोटन तुझी कायम आठवण येत राहील. अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. https://twitter.com/FarOutAkhtar/status/1350391272687558659 ओलानोकियोटनच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. फरहान अख्तरसह अनेक नामांकित कलाकारांनी
इतिहास

देशातील पहिला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. दुर्दैवाने अनेकांना बाबासाहेब शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची […]

पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न

टेक इट EASY

अॅमेझॉननंतर फ्लिपकार्टही आता मराठीत

मुंबई : अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला […]

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खूशखबर ! जिओला टक्कर देण्यासाठी घेतला मोठा निर्णय

तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? तर तुमच्यासाठी आहे महत्वाची बातमी

गुगल डाऊन झाल्याने संतापले नेटीझन्स; ट्विटरवर मिम्सचा धुमाकूळ

लाइफफंडा

Flipkart Big Saving Days Sale ला सुरूवात; स्वस्तात स्मार्टफोन खरेदीची संधी

नवी दिल्ली : येत्या २९ जानेवारीपासून फ्लिपकार्टवर Flipkart Big Saving Days Sale ला सुरूवात होणार आहे. फ्लिपकार्टने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या अतंर्गत सर्व प्रोडक्ट्सवर एचडीएफसी बँक कार्ड्स द्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे. तसेच, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला सेलचे अॅक्सेस १९ जानेवारी पासून रात्री १२ पासून मिळणार आहे. या सेलमध्ये […]

२१ जानेवारीला लाँच होतोय विवोचा Vivo X60 Pro+; ‘ही’ आहेत जबरदस्त फीचर्स

विवोचा Vivo Y51A हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच; ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स

‘हा’ आहे जीओचा सर्वात कमी किमतीचा ऑल इन वन प्लान; अनलिमिटेड कॉल आणि डेटा

काम-धंदा

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट […]

लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी; सेव्हन स्टारमधील शेफने चालू केला बिर्याणीचा स्टॉल