कसबा पोटनिवडणुकीत राहुल गांधींची एंट्री; एका फोनवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघार
राजकारण

कसबा पोटनिवडणुकीत राहुल गांधींची एंट्री; एका फोनवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठीकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करत होते. आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी […]

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार
बातमी मुंबई

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ म्हटले जाणार असल्याची माहिती […]

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं. राहुल गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेतील अनुभवांची मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे मुद्दे, पीक विमा योजना आणि अदानी उद्योग समूह आणि हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन हल्लाबोल केला. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न […]

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणार
बातमी मुंबई

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणार

मुंबई,  :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. […]

कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज? भाजपला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात उतरणार
राजकारण

कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज? भाजपला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात उतरणार

पुणे: कसबा पोटनिवडणुकीचे वातावरण आता चांगलेच पेटले आहे. कसब्यात लावण्यात आलेल्या एका बॅनरची राज्यभर चर्चा होत असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसते.’कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे. […]

..तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडून भाजपची तर उद्धव ठाकरेंकडून सेनेची ऑफर; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट
राजकारण

..तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडून भाजपची तर उद्धव ठाकरेंकडून सेनेची ऑफर; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

ठाणे : ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून जोरदार फोडाफोडी सुरू आहे. तब्बल 22 नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मी साधारण 1987 साली माझे भाग्यविधाते आदरणीय पवार साहेब यांच्या संपर्कात आलो अन् माझ्या राजकीय कारकिर्दीला खर्‍या अर्थाने […]

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; महिला मदतीला धावल्या, हुल्लडबाजांना दांडक्यांनी आवरलं
मनोरंजन

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; महिला मदतीला धावल्या, हुल्लडबाजांना दांडक्यांनी आवरलं

मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. या घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील भैरवाडी येथे रीलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमस्थळी ‘सबसे कातील, […]

महिला आयपीएलला केव्हा होणार सुरुवात? आणि कधी रंगणार फायनल, जाणून घ्या
क्रीडा

महिला आयपीएलला केव्हा होणार सुरुवात? आणि कधी रंगणार फायनल, जाणून घ्या

महिलांची आयपीएल नेमकी कधी सुरु होणार आणि फायनलचा सामना कधी रंगणार हे आता समोर आले आहे. महिला आयपीएलच्या लिलावासाठी बीसीसीआयला हॉटेल मिळत नसल्यामुळे ते ट्रोल झाले होते. पण आता हा लिलाव कधी होणार आणि आयपीएलचे सामने कधी होणार या गोष्टी आता समोर आल्या आहेत. महिलांच्या आयपीएलला ४ मार्चला सुरुवात होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या […]

विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय! प्रवाशाची अजब मागणी; एअर होस्टेसनं काय केलं?
वायरल झालं जी

विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय! प्रवाशाची अजब मागणी; एअर होस्टेसनं काय केलं?

मुंबई: अलीकडच्या काळात विमानात हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेससोबत गैरवर्तन किंवा विनयभंगाच्या घटना घडल्याचे प्रकार अनेकदा कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाने विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या सगळ्या नकारात्मक बातम्यांच्या गदारोळात सोशल मीडियावर सध्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत […]

BCom विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, २०२३ मध्ये ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार
काम-धंदा

BCom विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, २०२३ मध्ये ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार

बीकॉम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्यांचे पर्याय उपलब्ध असतात. बीकॉम झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२२ हे वर्ष आता संपणार आहे. पण तुम्हाला अजून नोकरी मिळाली नसेल तर काळजी करू नका. २०२३ मध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची खात्रीशीर नोकरी मिळू शकते. फक्त यासाठी एक अट आहे. ती म्हणजे पुढे दिलेल्यापैकी कोणत्याही एका […]