मनोरंजन

अनुराग कश्यपला समर्थन देणाऱ्या तापसी पन्नुला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने केलेल्या आरोपांनी चांगलीच खळबळ माजली आहे. पायल घोषने केलेल्या आरोपांनंतर आता अभिनेत्री तापसी पन्नू अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. मात्र अनेक नेटकऱ्यानी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणीही मागितली आहे. […]

बातमी विदेश

युरोपातील डेन्मार्कचे फेरो बेट आहे अत्यंत सुंदर; पण…

युरोपीय खंडातील डेन्मार्कची जगातील दुसरा सर्वात सुंदर आणि शांत देश म्हणून ओळख आहे. 57 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पण येथील एक प्रथा पाहून आपल्याला वाईट वाटेल. या प्रथेनुसार, दरवर्षी उन्हाळ्यात समुद्र रक्ताने लाल होतो. (प्रातिनिधिक छायाचित्र) डेन्मार्क राज्याचा भाग असलेल्या स्कॉटलंडच्या उत्तरेस 200 मैलांवर फेरो बेट आहे. काही दिवसांपूर्वी फेरो […]

देश बातमी

विरोधकांच्या प्रचंड गदारोळात अखेर कृषीविषयक विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयके अखेर मंजूर करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली होती. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक 2020 ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली. आवाजी मतदान घेत या दोन विधेयकांना […]

देश बातमी

तर, पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी सनी देओलवर घालणार ‘सामाजिक बहिष्कार’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काल लोकसभेत कृषिविषयक तीन विधेयके मंजूर केली जी आज राज्यसभेत सादर करण्यात आली आहेत. राज्यसभेत या विरोधकांनी या विधेयकांना प्रचंड विरोध केला आहे. तर दुसरीकडे पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी देखील या विधेयकाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच भाजपा नेत्यांवर बहिष्कार घालण्याच्या चर्चादेखील सुरु आहेत. पंजाबमधील शेतकरी गुरुदासपुरचे खासदार सनी देओल […]

देश बातमी

कृषि क्षेत्राशी संबधित विधेयकावर संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल; म्हणाले…

नवी दिल्ली : ” देशातील ७० टक्के लोक शेतीशी जोडले गेलेले आहेत. संपूर्ण लॉकडाउनच्या काळात शेतकरी काम करत होता. ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?,यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही,” याची ग्वाही सरकार देणार का?,” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला. केंद्र सरकारने कृषि क्षेत्राशी संबंधित […]

देश बातमी

खळबळजनक : कैद्याच्या शरीरातून काढले ४ मोबाईल फोन

नवी दिल्ली : राजस्थानच्या जोधपूरमधील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका 32 वर्षीय कैद्याने आपल्या मलाशयात तब्बल चार मोबाईल लपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कैद्याच्या वैद्यकीय तपासादरम्यान ही बाब समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपुर कारागृहातील या कैद्याचे नाव देव राम असं आहे. तो […]

मनोरंजन

अभिनेत्री पायल घोषचे दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप; अनुरागकडून मात्र आरोपांचे खंडन

मुंबई : ”मला शांत करण्याच्या प्रयत्नात इतके खोटे बोललात की तुम्ही एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढचं म्हणेल की, तुमचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” असे स्पष्टीकरण देत दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभिनेत्री पायाल घोषचे आरोप फेटाळून लावले आहेत. पायल घोषने अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या […]

देश बातमी

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार?

नवी दिल्ली : ”दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. कोणत्याही चलनी नोटा बंद करण्यापूर्वी केंद्रसरकार सर्वात आधी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेते. त्यानंतरच नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.” अशी माहिती काल लोकसभेत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. याबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ”आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 […]

बातमी विदेश

धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पत्राद्वारे विषप्रयोगाचा प्रयत्न

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरूद्ध एक मोठे षडयंत्र सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विषयुक्त पत्र पाठविण्यात आले होते. मात्र सुरक्षा यंत्रणांनी वेळीच याची पडताळणी केल्यामुळे त्यांच्यावरील हा विषप्रयोगाचा हा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही.  जेव्हा सुरक्षा यंत्रणांना या पत्रावर संशय आला तेव्हा त्यांनी या पत्राची तपासणी केली. या तपासणीत या पत्रात […]

राजकारण

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपणार?

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपविण्याची विनंती सर्व पक्षांच्या सदस्यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घेणार आहेत. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसातच हे अधिवेशन संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्वच पक्षांच्या खासदारांचे कोरोनाची परिस्थिती पाहता अधिवेशन […]