कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज; आत्तापर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात काल (ता. ०३) दिवसभरात ८ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळेल राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही १७ लाख ३ हजार २७४ झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९२.७० टक्के इतका झाला असून काल राज्यात राज्यात ५ हजार १८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल एकूण ११५ मृत्यूंची […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका; जिंकला सर्वोत्तम पुरस्कार

सोलापूर : सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात आपला डंका वाजवला असून युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी निवड होणारे ते पहिले भारतिय शिक्षक आहेत. सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी […]

देश बातमी

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न

नवी दिल्ली : शेतकरी एकवेळ स्वतःच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर आले तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीत शेतकरी करत असलेले आंदोलन आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ […]

राजकारण

विधान परिषद निवडणुकीचे निकाल हाती आले; पाहा कोणी कुठे मारली बाजी?

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अशा सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चित झाले आहेत. त्यापैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे आहेत. तर धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांचे […]

देश बातमी

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकार सोबतची बैठक निष्फळ

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि ४० शेतकरी नेत्यांमध्ये बैठक झाली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. यापार्श्वभूमीवर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत सात तास चाललेली बैठक यशस्वी होऊ शकली नाही. या बैठकीत शेतकरी नेते कृषी कायद्यांमध्ये […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस

नवी दिल्ली : कोरोनासारखी महामारी आली आणि याचा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे लस कधी येणार? पण कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त […]

राजकारण

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्यावर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पवार यांनी सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बोलताना […]

मनोरंजन

विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती

मुंबई : भारतिय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सध्या सर्वांचे लाडके सेलिब्रिटी कपल आहेत. बऱ्याचवेळा विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असतात. त्या दोघांकडे मिळून एकूण किती संपत्ती असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फॉर्ब्स आणि जीक्यूने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी २०२०मध्ये विराट आणि अनुष्काकडे एकूण […]

देश बातमी

धक्कादायक ! मधाच्या नावाखाली पतंजली विकते साखरेचा पाक

नवी दिल्ली : मधाच्या नावाखाली रामदेव बाबांची पतंजली कंपनी साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पतंजलीसह अनेक बड्या कंपन्या हे करत असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE)ने केलेल्या तपासातून उघड झाले आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचं या तपासाद्वारे समोर आलं आहे. सीएसईनं १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या […]

राजकारण

विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी

धुळे : विधान परिषदेचा पहिला निकाल आताच हाती आला असून भारतीय जनता पक्षाच्या अमरीश भाई पटेल यांनी बाजी मारली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु झाली आहे. धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपचे […]