२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ – प्रकाश आंबेडकर
राजकारण

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ – प्रकाश आंबेडकर

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.आंबेडकर यांनी पत्रकाराशी बोलताना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. देश परत एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, असं ते म्हणाले. सरकार कोणाचं येईल हे मी सांगू शकत […]

ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप
बातमी मुंबई

ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप

ठाणे : उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या कारभारावरही […]

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक
बातमी मुंबई

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक

मुंबई, दि. 12: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्री श्री. सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पत्रकार […]

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी
पुणे बातमी

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी

पुणे दि.12: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि […]

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने
पुणे बातमी

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने

लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. ते आता सुरळीत झाले असून पावसाचे प्रमाण देखील कमी […]

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
क्रीडा

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलिकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी […]

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी यांची यादी जाहीर
बातमी मुंबई

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी यांची यादी जाहीर

मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. नागपूर […]

शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार
शेती

शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. ९ : शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत […]

महाराष्ट्रात पुढील ७ दिवस कशी असेल पावसाची स्थिती?
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील ७ दिवस कशी असेल पावसाची स्थिती?

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती. त्याचे प्रत्यक्ष चित्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देशभरात दिसले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि नागलँड ही राज्ये वगळता उर्वरित राज्यांत पावसाची तूट नोंदवली गेली. महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरीच्या ५३ टक्के तूट नोंदवली गेली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मध्य […]

अखेर पाकिस्तान सरकार झुकले, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ
क्रीडा

अखेर पाकिस्तान सरकार झुकले, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान राजकीय संबंध चांगले नसल्याने दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. भारत आणि पाक या दोन क्रिकेट संघांचा आमना-सामना केवळ आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्येच होत असतो. इतकेच नाही तर हे […]