देश

सरकारची चिंता वाढली; देशाचे एकूण कर्ज गेलंय तब्बल एवढ्या रुपयांवर

कोरोनामुळे सध्या देश आर्थिक संकटांचा सामना करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कर्जामध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका अहवालानुसार जून 2020 च्या अखेरपर्यंत सरकारचे कर्ज वाढून ते तब्बल 101.3 लाख कोटींपर्यंत गेलं आहे. कोरोनाचं संकट आल्यावर भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आणि त्यानंतर सातत्याने कर्जात वाढ होत गेली आहे. सार्वजनिक कर्जाच्या […]

ब्लॉग

एसआयपी : गुंतवणुकीचा दमदार पर्याय

छोट्या रकमेनिशी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडातील सिस्टॅमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हा एक अत्यंत सुलभ आणि उत्तम पर्याय आहे. एसआयपी या गुंतवणूक प्रकाराद्वारे एकाचवेळी छोट्या रकमेने गुंतवणूक करता येणे, गुंतवणुकीत सातत्य निर्माण होणे, आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करणे या सारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींची काळजी आपोआपच घेतली जाते. सर्वसामान्यांसाठी संपत्ती निर्मितीचा अतिशय चांगला पर्याय […]

महाराष्ट्र महिला विशेष

शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी एसटीकडून विशेष बससेवा

मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी एसटीकडून विशेष बससेवा सुरु करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने प्रवासासाठी प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यात सरकारने ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढणार आहे. तो ताण कमी करण्यासाठी […]

टेक इट EASY

भारतानंतर अमेरिकेचाही चीनला धक्का; Tiktok, We Chat ॲपला रविवारपासून बंदी

भारताने चीनी ॲप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकेनेही चीनला मोठा झटका दिला आहे. चीनच्या टिकटॉक आणि वी चॅट ॲपवर येत्या रविवारपासून बंदी काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटने हे आदेश काढले आहेत. अमेरिकेत 20 सप्टेंबरपासून युझर्सना टिकटॉक आणि वी चॅट ॲप डाऊनलोड करता येणार नाही. अमेरिकेत टिक-टॉकचे 10 कोटी युझर्स आहेत.  पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले, मराठा समाजातील काही नेत्यांनाच मराठा आरक्षण नको-उदयनराजे भोसले

“प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील मराठा समाजातील काही नेत्यांनाच मराठा आरक्षण नको आहे. त्यांना आपल्या हातातील नेतृत्व गरिब मराठा समाजाच्या हातात जाईल अशी भीती आहे. या लोकांना जनाची नाही किमान मनाची लाज असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.” अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमधील नेत्यांवर केली आहे. एका वृत्तवाहिनीला खासदार उदयनराजे भोसलेंनी […]

महाराष्ट्र

कोण होते हवालदार बचित्तर सिंह ? ज्यांना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी मिळाले होते देशातील पहिले अशोकचक्र

15 ऑगस्ट 1947 रोजी जरी आपला देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म 17 सप्टेंबर 1948 रोजीच झाला. स्वातंत्र्यानंतरही जवळपास 13 महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल 13 महिन्यांनंतर उजाडली. रझाकाराच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अनेकांनी प्राणाची बाजी लावली. त्यात हवालदार बचित्तर सिंह यांचे शौर्य अभूतपूर्व […]

मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीला धक्का; स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचे निधन

यंदाचे 2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी आणि मराठीचित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरले आहे. अनेक कलाकारांच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत प्रशांतने अब्दुल्ला दळवी ही भूमिका साकारली होती. 14 सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या […]

महाराष्ट्र

पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार; गृहमंत्र्यांनी दिली माहिती

राज्य सरकारने कालच 12 हजार 528 पोलिसांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. या पोलीस भरतीतील 13 टक्के जागा मराठा समाजातील तरुणांसाठी बाजूला ठेवणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा रिक्त ठेवा अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची […]

देश

भारतात कोरोना लस कधी उपलब्ध होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

देशात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कोरोना लशीकडे लागले आहे. ही लस कधी येणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. यावर आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत माहिती दिली आहे. “भारत इतर देशांप्रमाणेच प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ गट यावर लक्ष ठेवून आहे. आमच्याकडे आगामी काळाचे नियोजन आहे. आम्हाला […]

महाराष्ट्र

हा मराठा समाजाला एकटे पाडण्याचा कुटील डाव?: संभाजीराजे भोसले

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाजामध्ये याचे तीव्र पडसाद उमटत असून त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करुन मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज ह्या निर्णयाचा विरोध करणार हे माहीती असून सुध्दा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णत: चुकीचे आहे. हा मराठा […]