हॅलो…! हॅलो…!! अन् १५९ वर्षांपूर्वी लागला टेलिफोनचा शोध
ब्लॉग

हॅलो…! हॅलो…!! अन् १५९ वर्षांपूर्वी लागला टेलिफोनचा शोध

दूरसंपर्काच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने लावला, त्या घटनेला १ जून २०२१ रोजी १५९ वर्षे झाली. खरे तर बेल मूक-बधिरांसाठी संपर्काचे प्रभावी उपकरण बनवण्याचा खटपटीत होता. वॅाटसन नावाचा त्याचा एक साथीदार त्याला मदत करत होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अपघातानेच त्यांच्या ध्यानात आले की, ध्वनीलहरींचे विद्युत चुंबकीय लहरी व विद्युत चुंबकीय लहरींचे ध्वनिलहरींत रुपांतर करणे शक्य आहे. त्या दिशेनेच अथक प्रयत्न करून बेलने टेलिफोनचे यंत्र तयार केले. एका खोलीत बोललेले दुसऱ्या खोलीत केवळ तारेच्या साह्याने ऐकू येते, हा मोठाच चमत्कार होता. त्यामुळे बेलच्या नावाचा जगभर बोलबाला झाला. त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

हॅलो हा शब्द कसा आला याची एक कथा सांगितली जाते. बेलने पहिला फोन त्याची मैत्रिण मेरी हॅलो हिला केला. तिने फोन उचलताच आनंदाने बेभान झालेला बेल ‘हॅलो हॅलो’ असे ओरडत राहीला. त्यातूनच फोन करताच ‘हॅलो’ म्हणण्यास सुरूवात झाली असावी.

लेखक – भारतकुमार राऊत
लेखक राज्यसभेचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.