शाळेतूनच सुरु झाली होती प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची प्रेमकहाणी
ब्लॉग

शाळेतूनच सुरु झाली होती प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची प्रेमकहाणी

देशाच्या राजकीय राजकरणात गांधी कुटुंबाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गांधी कुटुंब हे देशातील सर्वात मोठे राजकीय कुटुंब आहे. या कुटुंबाबाबत जाणून घेण्यासाठी अनेकजण  उत्सुक असतात. गांधी कुटुंबातील अशीच एक अत्यंत रंजक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबद्दल. प्रियांका गांधी यांनी नुकताच त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा केला. प्रियांका गांधीचा जन्म १२  जानेवारी १९७२ रोजी गांधी कुटुंबात झाला. प्रियांका गांधीची प्रेमकहाणीही तितकीच रंजक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजकारणात सक्रिय असलेल्या प्रियंका गांधींची लव्ह लाइफदेखील तितकीच रंजक आहे. प्रियांका गांधी यांनी 18 फेब्रुवारी 1997 रोजी देशातील बड्या उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्याशी लग्न केले. गेले 24 वर्षांपासून ते एकत्र आहेत.

प्रियांका गांधी यांनीदेखील आपले वडील राजीव गांधी यांच्यासारखा प्रेम विवाह केला. प्रियंका गांधी दिल्लीतील व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रेमात पडल्या. वयाच्या १३ व्या वर्षी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले.

व्यावसायिक कुटुंबातले रॉबर्ट वाद्रा यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नव्हती. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९६९ रोजी मध्यप्रदेशातील मुरादाबाद शहरात झाला. मुरादाबाद पितळ कामासाठी प्रसिद्ध आहे. वड्राचे वडील राजेंद्र वड्रा हे पितळेचे उद्योजक होते. रॉबर्ट वड्रा आणि प्रियांका एकाच शाळेत शिकत असत. दोघांची भेट रॉबर्ट वाड्राची बहीण मिशेल वाड्रा यांच्यामार्फत झाली. तेव्हापासून हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले होते.

रॉबर्ट वाड्रा यांचे कुटुंब पितळ व कृत्रिम दागिन्यांच्या व्यवसायात होते. रॉबर्ट अनेकदा प्रियांकाला खास ज्वेलरी गिफ्ट म्हणून देत असे. त्यानंतर हळूहळू राहुल गांधी हेदेखील त्यांचे चांगले मित्र झाले. एकदा प्रियंका रॉबर्ट वाड्रा यांना भेटायला मुरादाबादला गेल्या असता त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. मात्र, रॉबर्ट वाड्रा यांना त्यांच्या नात्याविषयी चर्चा नको होती.

रॉबर्ट वाड्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही दिल्लीतील ब्रिटीश शाळेत शिकत असताना भेटलो. मला वाटलं की तिला माझ्यात रस आहे. आम्ही दोघे एकमेकांशी खूप बोलायचो. पण मला वाटायचे की, आमच्या नात्याबद्दल कोणालाही माहिती व्हायला नको. कारण लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतले असते.

प्रियांका यांच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु वर्गमित्र असल्याने रॉबर्ट आणि प्रियांकाला एकमेकांना भेटण्याची संधी मिळत असे. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी थेट प्रियांका यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. प्रियांका आणि गांधी कुटुंब रॉबर्ट वाड्रा यांना लहानपणापासूनच ओळखत होते, म्हणून प्रियांका यांनीदेखील लग्नासाठी लगेच सहमती दर्शविली.

जेव्हा प्रियंका-रॉबर्टने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आणि कुटुंबाला देखील याविषयी माहिती दिली. एका रिपोर्ट्सनुसार रॉबर्ट यांचे वडील सुरवातीला या लग्नासाठी तयार नव्हते. पण नंतर त्यांनी लग्नाला मान्यता दिली. 18 फेब्रुवारी 1997 रोजी दोघांचे लग्न झाले. दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झाले. प्रियांका आणि रॉबर्टला यांना मिराया वाड्रा आणि रेहान वाड्रा अशी दोन मुलंही आहेत. संपूर्ण कुटुंब गुडगावमध्ये राहते. रॉबर्ट यांचा साधेपणा प्रियंका याना भावला आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालण्याचा विश्वास एकमेकांना दिला.

प्रियांका गांधी यांनी एका मुलाखतीत पती रॉबर्ट वाड्रा यांच्याबद्दल सांगितले होते की, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी मलाही इतरांप्रमाणेच वागवले. ही गोष्ट मला खूप आवडली. ते मानाने खूप प्रामाणिक आहेत. ते मनाने फार प्रामाणिक व्यक्ती आहेत आणि इतर गोष्टींचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. गांधी कुटुंबासारखे उच्च कौटुंबिक राजकीय कौटुंबिक वातावरण त्याच्यासाठी नवीन होते, परंतु त्यांनी सर्वकाही ज्या प्रकारे हाताळले ते आश्चर्यकारक आहे.”

अशाच प्रकारे गेले २४ वर्षे ते अत्यंत कठीण परिस्थितीतही प्रियांका आणि रॉबर्ट एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि यामुळे त्यांची प्रेमकथा ही इतरांसाठी एक उदाहरण ठरली आहे.