ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं ८८ व्या वर्षी आज (ता. ०४) राहत्या घरी निधन झालं. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दु:खद बातमी शेअर केली आहे. ७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शशिकला […]

अक्षयच्या लक्ष्मीचा टीव्ही विश्वात अनोखा विक्रम
मनोरंजन

अक्षयच्या लक्ष्मीचा टीव्ही विश्वात अनोखा विक्रम

मुंबई : काही महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. आता या चित्रपटाने टीव्हीवर नवा विक्रम केला आहे. २१ मार्च रोजी ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजीन प्रिमिअर पार पडला. त्यावेळी चित्रपटाला संपूर्ण भारतात ६३ मिलियन व्ह्यूअर्स मिळाले […]

बॉलिवूडला धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शहाचं निधन
मनोरंजन

बॉलिवूडला धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शहाचं निधन

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन झालं असून शनिवारी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. तारिक शहा यांना किडनीचा आजार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते डायलेसिसवर होते. बहार आने तक, मुंबई सेंट्रल, एहसास, […]

आर माधवनच्या रॉकेट्रीचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात शाहरुखही दिसणार
मनोरंजन

आर माधवनच्या रॉकेट्रीचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात शाहरुखही दिसणार

मुंबई : अभिनेता आर माधवनचा आगामी चित्रपट रॉकेट्री : नम्बी इफेक्टचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधवनच्या या चित्रपटात शाहरुख खान भूमिका साकारणार असल्यामुळे चित्रपटाची चोरदार चर्चा आहे. ट्रेलरमध्येही शाहरुखची झलक पाहायला मिळाली आहे. रॉकेट्री : नम्बी इफेक्ट हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित आहे. २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नम्बी यांचा संपूर्ण […]

शेवंता येणार! पांडूने पाहिली, तुम्ही पाहिली का?
मनोरंजन

शेवंता येणार! पांडूने पाहिली, तुम्ही पाहिली का?

मुंबई : रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरु होऊन काही दिवस लोटले तरी मात्र सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय ती म्हणजे शेवंताला पाहण्याची. मालिकेच्या आधीच्या भागात अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे मालिकेच्या तिसऱ्या भागात शेवंताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यातच झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेवंता कधी भेटीला […]

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे कॅनडात निधन
मनोरंजन

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे कॅनडात निधन

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत कादर खान यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचे कॅनडात निधन झाले आहे. अब्दुल कुद्दुस कॅनडात स्थित असून तिथेच विमानतळावर सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. अब्दुल कुद्दुस यांच्या निधनाची बातमी बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक फोटो पोस्ट करत दिली आहे. कादर खान यांनी अजरा खान यांच्याशी लग्न केले […]

रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही
मनोरंजन

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गेली 30 वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. […]

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर येणार वेल डन बेबी; ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर येणार वेल डन बेबी; ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट वेल डन बेबी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. वेल डन बेबी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक […]

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन; अभिनेत्याला एअरपोर्टवरून अटक
मनोरंजन

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन; अभिनेत्याला एअरपोर्टवरून अटक

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतून एनसीबीनं शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खानला एअरपोर्टवरून अटक करण्यात आली आहे. शादाबच्या चौकशीतूनच एजाज खानचं नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला अखेर एनसीबीनं अटक केलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, एजाज खानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीनं […]

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा; इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
मनोरंजन

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा; इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुंबई : फिल्म फेअर पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. फिल्मफेअर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. नुकताच ६६व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२१ची घोषणा झाली. यामध्ये बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खानला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. फिल्मफेअर पुरस्कार पटकावणे हे प्रत्येक बॉलिवूड कलाकारचे स्वप्न असते. चित्रपटांमधील अफलातून कामगिरीच्याच जोरावर या पुरस्कारावर […]