राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल

नवी दिल्ली : ”राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही, असे मत मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी व्यक्त केलं. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी […]

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी 8 ते 18 मार्च असं वेळापत्रक दिलं होतं. मात्र, त्याप्रमाणे आता सुनावणी होणार नसून, 15 मार्चलाच सुनावणी होईल. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्या संमेलनाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्या संमेलनाचा मोठा निर्णय

नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन साहित्य संमेलनाबाबत अंतिम निर्णय घेण्याबाबत विचार विनिमय सुरू होता. अखेर आज नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे. नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे […]

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
बातमी महाराष्ट्र

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं. कोरोना संसर्गामुळे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही […]

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
बातमी महाराष्ट्र

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला असून या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती करत आहेत. दरम्यान, हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल […]

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत
बातमी महाराष्ट्र

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत

मुंबई : कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, हे देखील वाईट कृत्य असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने एसओपी लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली. […]

नवउद्योजकांना मिळणार अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाची साथ; डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज विशेष मुलाखत
बातमी महाराष्ट्र

नवउद्योजकांना मिळणार अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाची साथ; डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज विशेष मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात ‘नवउद्योजकांना प्रोत्साहन’ या विषयावर महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या म्हणजेच गुरूवार दिनांक ०४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून नवउद्योजकांना मोठे प्रोत्साहन मिळाणार असून […]

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : अमित देशमुखांचे स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : अमित देशमुखांचे स्पष्टीकरण

मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ८ मार्चपासून सुरु होणारी एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. मात्र या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती मंत्री अमित देशमुख […]

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
बातमी महाराष्ट्र

संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षेपूर्वी राजेश टोपेंच विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातील विविध पदे भरण्यासाठी रविवारी २८ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे. यासोबत त्यांना एक महत्त्वाचे आवाहनही केले आहे. परीक्षार्थींनी धीर देण्याचा आणि गुणवत्तेलाच […]