मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम
बातमी मराठवाडा

मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम

नांदेड : काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर नांदेड पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी ऑलआउट ऑपरेशन राबवून गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त केली जात आहे. शनिवारी वजीराबाद पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करुन चार पिस्तूल आणि ३० जिवंत काडतूस जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले काडतूस आणि पिस्तूल मध्यप्रदेश राज्यातून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झालं […]

आम्हाला औरंगजेबासोबत काही देणं घेणं नाही; ‘औरंगजेब आमच्यावर का लादता?’, इम्तियाज जलील यांचा सवाल
बातमी मराठवाडा

आम्हाला औरंगजेबासोबत काही देणं घेणं नाही; ‘औरंगजेब आमच्यावर का लादता?’, इम्तियाज जलील यांचा सवाल

खासदार इम्तियाज जलील यांचं गेल्या तीन दिवसांपासून साखळी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराला त्यांचा विरोध आहे. त्यासाठीच त्यांचं आंदोलन सुरु आहे. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलेला. त्यावरुन वाद निर्माण झालाय. पण जलील यांनी संबंधित प्रकाराचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी संबंधित प्रकारावर आपली भूमिका मांडली. भाजप आणि शिवसेनेकडून जलील यांच्यावर टीका केली […]

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगर लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट
बातमी मराठवाडा

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगर लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट

छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती संभाजीनगर लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली. शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. छत्रपती संभाजीनगर लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते. […]

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’
बातमी मराठवाडा

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’

मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद” या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद […]

BRS पार्टीमध्ये या चार माजी आमदारांचा प्रवेश; नांदेड येथील केसीआर यांच्या सभेला मोठी गर्दी
बातमी मराठवाडा

BRS पार्टीमध्ये या चार माजी आमदारांचा प्रवेश; नांदेड येथील केसीआर यांच्या सभेला मोठी गर्दी

नांदेड : तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती करण्यात आल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देशभर पक्ष विस्ताराकरिता त्यांनी प्रथम महाराष्ट्राची निवड केली. तेलंगणाच्या सीमेपासून जवळ असलेल्या नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची काल जाहीर सभा झाली. महाराष्ट्रातील चार माजी आमदार यांनी मुख्यमंत्री के सी आर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पार्टीमध्ये […]

इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला; भारतीय बौद्ध पद्धतीने दोघांचं लग्न
बातमी मराठवाडा

इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला; भारतीय बौद्ध पद्धतीने दोघांचं लग्न

औरंगाबाद : इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला. दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीनं हा विवाह सोहळा गुरुवारी औरंगाबादेत पार पडला. या आगळ्या वेगळ्या लग्नाची शहरात जोरदार चर्चा आहे. मुलगी महाराष्ट्रीय, तर मुलगा थेट इंग्लंडचा. त्यामुळे चर्चा तर होणारच. विशेष म्हणजे दोघांचं लग्न भारतीय पद्धतीने झालं. इंग्लंडचं क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश […]

Nanded News: हात थरथरू नये म्हणून आधी पिऊन नंतर पोटच्याच मुलीचा केला गळा दाबून खून
मराठवाडा

Nanded News: हात थरथरू नये म्हणून आधी पिऊन नंतर पोटच्याच मुलीचा केला गळा दाबून खून

नांदेडपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी महिपाल गावात एक संतापजनक घटना घडली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शुभांगी जोगदंड या २३ वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे शुभांगीचे गावातील एका नातेवाइकांच्या प्रेमात पडली असता तिच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते म्हणून शुभांगीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचे नाते तोडले. शुभांगीचे […]

नांदेडमध्ये उड्डाणपुलावर थरार; काँग्रेस कार्यकर्तीवर गोळीबार, हातातून गोळी आरपार
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये उड्डाणपुलावर थरार; काँग्रेस कार्यकर्तीवर गोळीबार, हातातून गोळी आरपार

नांदेड : नांदेड शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंटजवळ असलेल्या उड्डाणपुलावर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतवारा पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस […]

महावितरणमुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेला गमावलं, कुटुंबाचा आरोप, गाव धाय मोकलून रडलं
बातमी मराठवाडा

महावितरणमुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेला गमावलं, कुटुंबाचा आरोप, गाव धाय मोकलून रडलं

बीड :टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा विजेच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाला. विद्युत रोहित्राला फ्युज लावत असताना अचानक लाईट आल्याने शॉक लागून संतोषसह आणखी एकाला प्राण गमवावे लागले. याला विद्युत महामंडळाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप संतोष मुंडेचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा […]

महाराष्ट्रातील २५ गावांचे सरपंच, ग्रामस्थ म्हणतायेत आम्हाला तेलंगणात समाविष्ट करा; TRSकडून निवडणूक लढवणार अन्…
बातमी मराठवाडा

महाराष्ट्रातील २५ गावांचे सरपंच, ग्रामस्थ म्हणतायेत आम्हाला तेलंगणात समाविष्ट करा; TRSकडून निवडणूक लढवणार अन्…

नांदेड : नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि समर्थकांची नुकतीच बासरमध्ये बैठक झाली. या बैठकीत तेलंगणा राज्यामध्ये सामील होण्याबाबत अनुकुलता दर्शविण्यात आली. तसेच तेलंगणा राष्ट्र पार्टीचे उमेदवार उभे करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जोमाने लढविण्याचा निर्धार करण्यात आला. तेलंगणातील के.सी.आर सरकारने राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात प्रवेश करताना तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाच्या माध्यमातून तेलंगणा […]