बातमी मुंबई

राज्यातल्या ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं […]

बातमी मुंबई

अनिल देशमुखांना झटका; सचिन वाझे ‘ईडी’चा माफीचा साक्षीदार होणार

मुंबई: १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझे (Sachin Waze) याने ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आता १४ फेब्रुवारीला ईडी या पत्रासंदर्भात न्यायालयात आपलं म्हणणं मांडणार आहे. […]

बातमी मुंबई

मोठी बातमी : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Carporation) प्रशासकाची (Administrator) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 […]

बातमी मुंबई

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; यापुढे…

ठाणे : १२ डिसेंबर रोजी म्हाडाची परीक्षा पार पडणार होती. (MHADA recruitment exam) परंतु अपरिहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आली होती. याची माहिती काल रात्री उशिरा राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही परीक्षा म्हाडा स्वतः […]

बातमी मुंबई

अनिलकुमार गायकवाड यांची एमएसआरडीसीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केला आहे. अनिलकुमार गायकवाड हे नुकतेच […]

बातमी मुंबई

महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य शासनानं केली मनाई

मुंबई: येत्या ६ डिसेंबर, अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर करोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी देखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई […]

बातमी मुंबई

भीमांजली : ६ डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तालविहार संगीत संस्था आणि जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँप प्रस्तुत ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ६ […]

बातमी मुंबई

समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?; शाळेचा दाखला आला समोर

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची धार्मिक ओळख कोणती यावरून निर्माण झालेला संभ्रम अधिकच वाढला आहे. वानखेडे यांच्या शाळेचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यातून समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याकडं लक्ष वेधलं असून ही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचं म्हटलं […]

बातमी मुंबई

NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम?

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा सपाटा लावला आहे. वानखेडे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक गौप्यस्फोटानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. मलिकांच्या रोजच्या आरोपामुळे अखेर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला […]

बातमी मुंबई

२०२४ पर्यंत डॉ. आंबेडकरांचा ४५० फूट उंच पुतळा पूर्ण करण्याचा ‘एमएमआरडीए’चा संकल्प

मुंबई : २०२४ पर्यंत दादरमधील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. स्मारकाच्या पायाभरणीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून आता पुढील कामाला सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिल येथे १२ एकर जागेत उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीवर सोपविण्यात […]