शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
देश बातमी

Delhi Farmer Protest : …तर उपमुख्यमंत्री देणार राजीनामा

चंदीगढ : हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चौटाला यांनी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सुरू असलेल्या वादावर मौन सोडलं आहे. चौटाला यांनी माझ्यासाठी सदैव शेतकरी सर्वप्रथम आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी एमएसपी मिळाली नाहीतर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल. यामुळे आता हरियाणामधील भाजप […]

पोलिस उपअधिक्षकानं भ्रष्टाचारविरोधी दिले भाषण; अन् तासाभरातच लाच घेतली म्हणून अटक
देश बातमी

पोलिस उपअधिक्षकानं भ्रष्टाचारविरोधी दिले भाषण; अन् तासाभरातच लाच घेतली म्हणून अटक

रायपूर : राजस्थानात माधोपूर येथे बुधवारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. या कार्यक्रमात डीएसपी मीणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही […]

घरात सापडली आजोबांची डायरी; त्यावर गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी
देश बातमी

घरात सापडली आजोबांची डायरी; त्यावर गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी

आईसोबत घराची साफसफाई करत असताना एका व्यक्तीला त्याच्या आजोबांची जुनी डायरी सापडली. विशेष म्हणजे त्या डायरीमध्ये महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षर्‍या आहेत. Been cleaning my Mom's place over the last few days. On Saturday we discovered something which I wasn't aware of was at my […]

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही
देश बातमी

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही

नवी दिल्ली : “सरकार जर हट्टाला पेटलं असेल तर आम्हीही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. शेतकरी कायद्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या सन्मानाशी निगडीत विषय आहे. अशावेळी या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. सरकारने कायद्यात बदल करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. पण कायदे पूर्णपणे मागे घेण्याची आमची मागणी आहे” , असं भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]

धक्कादायक ! जेवणाला हात लावल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या
देश बातमी

धक्कादायक ! जेवणाला हात लावल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या

भोपाळ : जेवणाला हात लावला म्हणून एका दलित तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यात घडला आहे. देवराज अनुरागी असं या मृत तरुणाचे नाव असून तो छत्तरपूरचा रहिवाशी होता. देवराजने फक्त जेवणाला हात लावला म्हणून संतापलेल्या दोन तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. […]

मोठी बातमी : पुढच्या वर्षापासून सरकारी नोकरांच्या हातात येणार कमी पगार
देश बातमी

मोठी बातमी : पुढच्या वर्षापासून सरकारी नोकरांच्या हातात येणार कमी पगार

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या नोकरदार वर्गाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून देशात नवीन वेतन नियम लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे फक्त प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी बरोबरच हातात येणाऱ्या पगारावरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने नवीन वेज कोड विधेयक २०१९ मध्ये मांडलं होतं. हे विधेयक […]

तुम्ही आयकर भरत आहात; तर ३१ डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा होईल १० हजारांचा दंड
देश बातमी

तुम्ही आयकर भरत आहात; तर ३१ डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा होईल १० हजारांचा दंड

मुंबई : तुम्ही आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी असून ३१ डिसेंबरआधी तुम्ही आयकर भरणे आवश्यक आहे अन्यथा अन्यथा तुम्हाला १० हजारांचा दंड होऊ शकतो. देशामधील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने या वर्षी अनेकदा आयकर भरण्यासंदर्भातील कालावधीमध्ये वारंवार करदात्यांना दिलासा दिला आहे. वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून […]

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू
देश बातमी

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू

लखनौ : वरातीत डीजेवर सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील जनपद येथे घडली आहे. एका लग्न समारंभामध्ये लोकप्रिय गायिका सपना चौधरीचे गाणं लावलं नाही म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या तरुणाचा मृत्यू झाला. लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर […]

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
देश बातमी

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

झाशी (उत्तरप्रदेश) : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यात घडली असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यामधील इलाइट चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र आंदोलनाला सुरुवात करण्याआधीच या चौकात लावण्यात आलेल्या नेहरुंच्या पुतळ्याचे विटंबन झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. […]

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान
देश बातमी

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान

शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंद ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा भारत बंद संपतासंपता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली […]