देश बातमी

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग सहाव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र आता कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. आज दुपारी ३ वाजता केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. मात्र आज […]

देश बातमी

जेएनयूची विद्यार्थीनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप; वडिलांना जिवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदच्या वडीलांनी तिच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. अब्दुल रशीद असे तिच्या वडिलांचे नाव आहे. ते म्हणाले की, आपली मुलगी ज्या पद्धतीने भरपूर पैसा खर्च करून एनजीओ चालवित आहे, तेथूनच तिचे दहशतवाद्यांशीही संबंध असू शकतात हे स्पष्ट आहे. केंद्रीय एजन्सींकडे त्यांनी मुलीच्या चौकशीची मागणी केली आहे. शेहला रशीदच्या […]

देश बातमी

#जागतिकएड्सदिन : एड्स आणि एचआयव्ही; समज-गैरसमज आणि बरच काही

जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटी लोकांना आपला […]

देश

शेतकरी आंदोलन : पंजाब-हरियाणातील पंचायतींचा पुढाकार, घरातून एकला दिल्लीला पाठवण्याचे आवाहन

नवी दिल्ली- केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या जाचक कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून राजधानी दिल्लीत मोठ्या स्वरुपाचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांसह आता तेथील पंचायती देखील समोर आल्या आहेत. प्रत्येक घरातील एक व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाईल, असा निरोप पंजाब व हरियाणाच्या पंचायतींतून दिला जात आहे, […]

देश बातमी

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.२) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. याच […]

देश

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय

मुंबई- जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र हीच मर्यादा इतर कार्यक्रमांना देखील लावण्यात आली आहे. या विरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कारात किती लोकांनी सहभागी व्हावे याबाबत घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू […]

देश बातमी

लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण

पुणे : सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या कोरोना लसीवर एका स्वयंसेवकाने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणीदेखील केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या लसीच्या चाचणीत या स्वयंसेवकाला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि […]

देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी […]

देश बातमी

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद ; बँकेशी संबधित कामे आधीच उरकून घ्या

नवी दिल्ली : देशभरात येत्या डिसेंबर २०२० मध्ये १४ बँका बंद राहणार आहेत. साप्ताहिक सुट्टीसह, स्थानिक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. अनेक बँक ग्राहकांच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. 3 डिसेंबरपासून सुट्ट्या सुरू होणार 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर […]

देश बातमी

शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा घालत एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा आणि देशव्यापी आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. शेतकरी आंदोलकांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आज दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे […]