दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन

इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यमंत्री भरणे यांनी स्वत: ट्विट करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. विठोबा भरणे यांच्यावर आज बुधवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भरणेवाडी […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळ, वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे मात्र मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्याचा […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज ३०१८ नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाली असून सातत्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. दिवसभरात कोरोनातून बरे झाल्याने एकूण ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी […]

काय आहे पीएमसी घोटाळा प्रकरण? संजय राऊतांच्या पत्नीचा घोटाळ्याशी काय आहे संबध?
बातमी महाराष्ट्र

५ जानेवारीलाच हजर राहा; ईडीने वर्षा राऊतांना पुन्हा बजावलं समन्स

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने नोटीस पाठवली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 5 जानेवारी 2021 रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता ईडीने 5 जानेवारीलाच हजार राहण्यास […]

आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकीवर बहिष्कार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकीवर बहिष्कार

अकलूज : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये करावं, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा, इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते […]

पुरातत्व विभागाचा खुलासा; सोमनाथ मंदिराच्या खाली आहे 3 मजली इमारत आणि बौद्ध लेणी
देश बातमी

पुरातत्व विभागाचा खुलासा; सोमनाथ मंदिराच्या खाली आहे 3 मजली इमारत आणि बौद्ध लेणी

नवी दिल्ली : पुरातत्व विभागाच्या एका अहवालानुसार सोमनाथ मंदिराच्या खाली एल आकाराची मोठी इमारत असल्याचा खुलासा झाला आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असे असणाऱ्या सोमनाथ मंदिराच्या खाली ३ मजली इमारत आहे. आयआयटी गांधीनगर आणि ४ सहयोगी संस्थाच्या ऑर्कियोलॉजी एक्सपर्ट्सनी या गोष्टींचा शोध लावला आहे. पंतप्रधान आणि सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ही शोध मोहिम […]

ब्रिटनला जाणाऱ्या विमानांची थांबवलेली उड्डाणं आणखी लांबू शकतात : हरदीपसिंह पुरी
देश बातमी विदेश

ब्रिटनला जाणाऱ्या विमानांची थांबवलेली उड्डाणं आणखी लांबू शकतात : हरदीपसिंह पुरी

ब्रिटन : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ब्रिटनच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. मात्र आता ब्रिटनला जाणाऱ्या विमानांची थांबवलेली उड्डाणं आणखी लांबू शकतात. शी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. हरदीपसिंग पुरी म्हणाले, “ब्रिटनला जाणाऱ्या विमानांच्या या तात्पुरत्या बंदीत आणखी […]

नोकरी देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्षाचा तरुणीवर बलात्कार?
बातमी मराठवाडा

नोकरी देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्षाचा तरुणीवर बलात्कार?

औरंगाबाद : नोकरी देण्याचं अमिष दाखवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथे राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर […]

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय
देश बातमी

लैंगिक हेतूशिवाय कोणताही शारीरिक संपर्क पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही : उच्च न्यायालय

मुंबई : उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याचबरोबर अनावधानाने किंवा कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय कोणताही शारीरिक संपर्क लैंगिक अत्याचार ठरत नसल्याने तो पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवत संबधित तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बारामती शहर पोलिसांनी आरोपीवर आयपीसीअंतर्गत व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविला. […]

मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…
देश बातमी

मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…

मुंबई : मुंबई पोलिसांची सोमवारी उच्च न्यायालयात सदर केलेल्या अहवालामुळे आता रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अर्णब गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिली. असा धक्कादायक गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. […]