राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई नाही; शिक्षण विभागाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई नाही; शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील शाळांमधी आता शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील शिपायांच्या सुमारे ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांची आकडा पुन्हा ४ हजारांच्या वर; दिवसभरात ८७ मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झालेला दिसत असला तरी आणखी धोका टळला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण, मागील २४ तासांत ४ हजारांपेक्षा जास्त म्हणजेच ४ हजार २६८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात २४ तासांत एकूण ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री राजेश […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

मेघालय : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी देशावरील कोरोनाचे संकट कधी कमी होईल हे सांगता येत नाही. कोरोना विषाणूची लागण ही फक्त सर्वसामान्य जनतेला होत नसून राजकारणी, कलाकार, खेळाडूंना देखील होत आहे. दरम्यान, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोनराड संगमा यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून […]

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू; काय आहेत नियम
बातमी महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू; काय आहेत नियम

मुंबई : आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र, आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेस कोडबाबत नवे नियम ठरवले आहेत. दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. […]

शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
देश बातमी

Delhi Farmer Protest : …तर उपमुख्यमंत्री देणार राजीनामा

चंदीगढ : हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चौटाला यांनी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सुरू असलेल्या वादावर मौन सोडलं आहे. चौटाला यांनी माझ्यासाठी सदैव शेतकरी सर्वप्रथम आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी एमएसपी मिळाली नाहीतर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल. यामुळे आता हरियाणामधील भाजप […]

राज्यातील अल्पसंख्यांक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण
बातमी महाराष्ट्र

राज्यातील अल्पसंख्यांक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या […]

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार
बातमी मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र हे आयव्ही लीग युनिव्हर्ससिटी अमेरीकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजक / स्टार्ट अप्ससाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस इन्क्युबेटर स्थापन करण्याकरीता पुन्हा एकदा आघाडीवर आहे. जागतिक दर्जाचा बिझनेस अॅक्सिलेटर कॉर्नेल महा 60 ची महाराष्ट्रातील उद्योजकांकरीता नवी मुंबई येथे स्थापना करण्यात आली आहे. डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन […]

राज्य सरकारची मोठी घोषणा ! उद्यापासून मिळणार मोफत रक्त
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारची मोठी घोषणा ! उद्यापासून मिळणार मोफत रक्त

मुंबई : शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी असून १२ डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे. टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले […]

पोलिस उपअधिक्षकानं भ्रष्टाचारविरोधी दिले भाषण; अन् तासाभरातच लाच घेतली म्हणून अटक
देश बातमी

पोलिस उपअधिक्षकानं भ्रष्टाचारविरोधी दिले भाषण; अन् तासाभरातच लाच घेतली म्हणून अटक

रायपूर : राजस्थानात माधोपूर येथे बुधवारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. या कार्यक्रमात डीएसपी मीणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही […]

घरात सापडली आजोबांची डायरी; त्यावर गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी
देश बातमी

घरात सापडली आजोबांची डायरी; त्यावर गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी

आईसोबत घराची साफसफाई करत असताना एका व्यक्तीला त्याच्या आजोबांची जुनी डायरी सापडली. विशेष म्हणजे त्या डायरीमध्ये महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षर्‍या आहेत. Been cleaning my Mom's place over the last few days. On Saturday we discovered something which I wasn't aware of was at my […]