पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल; नीलम गोऱ्हे यांची ग्वाही
पुणे बातमी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल; नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

पुणे : ”पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्यात. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. तसेच, सोबतचं जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. […]

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा
पुणे बातमी

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून सोबत असणाऱ्या २ मित्रांनी धक्कादायक दावा केला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे. याबाबत पूजाचे मित्र असलेल्या दोन तरुणांनी पोलीस जबाबात ही माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी अरूण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही […]

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती
पुणे बातमी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता ओरिसा केडरचे 2005 च्या आयएएस बॅचचे अधिकारी राजेश पाटील हे पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त असणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नागपूरहून पिंपरी-चिंचवडला महापालिका आयुक्तपदी बदली केली होती. पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त राजेश पाटील हे […]

गिरीश प्रभूणे यांच्या संस्थेला पाठवलेल्या नोटीसीला स्थगिती
पुणे बातमी

गिरीश प्रभूणे यांच्या संस्थेला पाठवलेल्या नोटीसीला स्थगिती

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीस प्रकरणी विधानभवनात बैठक पार पडली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलवली होती. यावेळी गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील संस्थेला पाठवलेली करवसुलीची नोटीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कराची रक्कमही कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने गिरीश प्रभुणे यांच्या […]

लॉजचा मालकच चालवायचा वेश्या व्यवसाय; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे बातमी

लॉजचा मालकच चालवायचा वेश्या व्यवसाय; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकातील पुणे-नगर रोडच्या लगत असणाऱ्या वृंदावन लॉजवर वेश्या व्यवसायाचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा पर्दाफाश केला आहे. लॉजचा मालकच वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे यातून उघडकीस आले आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या मदतीने ते वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. रांजणगाव एमआयडीसी […]

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश
पुणे बातमी

पुण्यात मोठे सेक्स रॅकेट उघड; 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल 16 नायजेरियन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपळे गुरव परिसरातल्या एका इमारतीत या तरुणी व्यवसाय करत होत्या. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली […]

माळशेज घाटात धोकादायक वळणावर पलटली बस; 2 ठार, 18 जखमी
पुणे बातमी

माळशेज घाटात धोकादायक वळणावर पलटली बस; 2 ठार, 18 जखमी

जुन्नर : पुणे जिल्ह्यात नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात एका धोकादायक वळणावर खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तब्बल 18 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली. नगरहून कल्याणकडे जाणारी बस क्रमांक MH-46 AH-0109 धोकादायक वळणावर पलटी झाली. अपघाताची बातमी समजताच परिसरातील सर्व […]

कराडमध्ये झालेल्या अपघातात पुण्यातील तिघांचा मृत्यू; सात जखमी
पुणे बातमी

कराडमध्ये झालेल्या अपघातात पुण्यातील तिघांचा मृत्यू; सात जखमी

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील तिघांचा कराडजवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात रविराज साळुंखे (वय ३०), राहुल दोरगे (वय २८) स्वप्नील शिंदे तिघेही रा. कात्रज अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे बंगलोर महामार्गावरील पाचवड फाटा ते आटके टप्पा परिसरात हा अपघात झाला. या भिषण अपघातात अन्य सातजण जखमी झाले आहेत. गणेश काळे […]

धक्कादायक ! अक्कल काढल्याच्या रागारातून वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला
पुणे बातमी

धक्कादायक ! अक्कल काढल्याच्या रागारातून वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला

पिंपरी-चिंचवड : अक्कल काढल्याच्या रागात दोघांनी थेट वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधील चाकण येथील मुख्य चौकात ही घटना घडली. रवींद्र नामदेव करवंदे (वय ३०) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. दरम्यान आरोपींना गुन्हे शाखा युनिट तीनच्या […]

डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह राज्यातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
पुणे बातमी

डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह राज्यातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या राष्ट्रपती पोलीस पदकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदकांमधील महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील ज्या 57 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहेत त्यात 4 पोलीस […]