पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून चिठ्ठी लिहत जावयाची आत्महत्या
पुणे बातमी

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून चिठ्ठी लिहत जावयाची आत्महत्या

पुणे : पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने चिठ्ठी लिहत आत्महत्या केली आहे. राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसंच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे. निखिल धोत्रे असं आत्महत्या केलेल्या […]

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अशात लसीकरणांवर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोनासदृश […]

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर
पुणे बातमी

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर

पुणे : पुण्यातील औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यांच्या एका चाहत्याने एक छोटं मंदिर उभारलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण याठिकाणी येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही याठिकाणी लावण्यात आला आहे. या […]

डीएसके कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
पुणे बातमी

डीएसके कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

मुंबई : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. के यांच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यामध्ये त्यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २०१८ पासून कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आहे. आजच्या निर्णयानंतर हेमंती यांची तुरुंगातून जामीनावर सुटका होणार आहे. मात्र याचवेळी न्यायालयाने डी. एस. के यांचा जामीन […]

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पुणे बातमी

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. कोण होते […]

कॉम्रेड विलास सोनवणे यांचे निधन
पुणे बातमी

कॉम्रेड विलास सोनवणे यांचे निधन

पुणे : संपूर्ण आयुष्य परिवर्तनवादी चळवळीसाठी समर्पित केलेला लढाऊ जीवनदानी कार्यकर्ता, तत्त्ववेता, मार्क्सवादी विचारक कॉम्रेड विलास सोनवणे (वय ६८) यांची आज (बुधवार, दि. ४ ऑगस्ट २०२१) सकाळी प्राणज्योत मालवली. कॉम्रेड सोनवणे यांना अमरधाम स्मशानभूमी, भक्तिशक्ती चौक, निगडी, पुणे येथे रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला. कॉ. सोनवणे हे मूळ जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी गावचे होते. विद्यार्थी […]

बिर्याणी तो बहाना है! मकसद दलित अधिकारी टार्गेट करना है!
पुणे बातमी

बिर्याणी तो बहाना है! मकसद दलित अधिकारी टार्गेट करना है!

पुणे : पुण्यातील पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमांवर फिरत आहे. त्यासोबतच विविध टीव्ही माध्यमांवर ही बातमी दाखवून नारनवरे यांना टार्गेट करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे यावर स्वतः पोलिस उपायुक्त नारनवरे यांनी खुलासा केला असून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे. दलित महिला […]

१६ कोटींच्या इंजेक्शनंतरही पुण्यातील वेदिकाचा मृत्यू
पुणे बातमी

पुण्यातील वेदिकाला झालेला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी हा आजार नेमका आहे तरी काय?

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमकुलीचं निधन झालं आहे. वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजार झाला. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला वाचवण्यासाठी १६ कोटी रुपये जमा केले होते. याच पैशांमधून तिला जून महिन्यात १६ कोटींचं इजेक्शन देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर महिन्याभरातच वेदिकाचा मृत्यू […]

१६ कोटींच्या इंजेक्शनंतरही पुण्यातील वेदिकाचा मृत्यू
पुणे बातमी

१६ कोटींच्या इंजेक्शनंतरही पुण्यातील वेदिकाचा मृत्यू

पुणे : लोकवर्गणीमधून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था केल्यानंतरही पिंपरी-चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमकुलीचं निधन झालं आहे. ०१ ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळता खेळता वेदिकाचा श्वास अचानक कोंडला. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी म्हणजेच एमएमए […]

महापौर मोहोळ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका; म्हणाले सुप्रियाताई…
पुणे बातमी

पुण्यातील भाजप नगरसेवक पूरग्रस्तांसाठी देणार एक महिन्याचं मानधन

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्व आमदार-खासदार पूरग्रस्तांना एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे घोषणेनंतर पुण्यातील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. ज्या भागांमध्ये सध्या […]