कराडजवळ आणखी एक अपघात; स्विफ्ट डिव्हायडरला धडकली, 4 ठार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कराडजवळ आणखी एक अपघात; स्विफ्ट डिव्हायडरला धडकली, 4 ठार

कराड : पुणे बंगळुरु महामार्गावर गेल्या रविवारी मोठा अपघात झाला होता. या अपघातात ३ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज (ता. ०७) आणखी एक अपघात झाला असून या अपघातात ४ जण ठार झाले आहेत. मारुती स्विफ्ट डिझायर कारला भीषण अपघात झाला असून एक जण जखमी असून तातडीने रग्णालयात हलवण्यात आले आहे. कराड तालुक्यातील वहागाव […]

५० लाखांची लाच मागितली, २० लाख घेताना अटक
पश्चिम महाराष्ट्र बातमी

५० लाखांची लाच मागितली, २० लाख घेताना अटक

कोल्हापूर : जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी कोल्हापूरात एका अधिकाऱ्याने ५० लाखांची लाच मागितली होती. ५० लाखांची रक्कम मागून २० लाखांवर तडजोड करून ती रक्कम स्वीकारणाऱ्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम मागितल्याचा हा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच प्रकार आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक नगर रचनाकार गणेश हनुमंत माने यांना ताब्यात […]

धक्कादायक ! पिसाळलेला कुत्रा चावल्याने साताऱ्यात दोघांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! पिसाळलेला कुत्रा चावल्याने साताऱ्यात दोघांचा मृत्यू

सातारा : साताऱ्यात जकातवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतल्याने युवक-युवतीचा मृत्यू झाला आहे. डबेवाडी येथील रुपाली बबन माने (वय २३) आणि जकातवाडी येथील देवानंद लोंढे (वय २५) असे या घटनेतील मृतांची नावे आहेत. मात्र, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी […]

भाजपला बगल देत भिडे म्हणतात शिवसेनाच हवी
पश्चिम महाराष्ट्र बातमी

भाजपला बगल देत भिडे म्हणतात शिवसेनाच हवी

मुंबई : या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच हवी असे मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजपने भिडेंना बगल दिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. एका चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाच्या नामकरणाचा […]

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजपाने खाते उघडले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजपाने खाते उघडले

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूरमधील गणेशवाडी ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर झाला असून ही ग्रा.पं. भाजपाने जिंकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. आता निकालाचा दिवस आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये […]

क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच
पश्चिम महाराष्ट्र बातमी

क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच

सांगली : सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटील( वय 35) असं मयत तरुणांचे नाव आहे. मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका […]

भाजपच्या उपमहापौरांना अटक; चंद्रकांत पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष
पश्चिम महाराष्ट्र बातमी

भाजपच्या उपमहापौरांना अटक; चंद्रकांत पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष

सोलापूर : सोलापूरमधील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच अन्य एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचाही आरोप होता. अखेर एका आठवड्यानंतर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी महापालिकेतील […]

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात घडली आहे. एकीकडे कोरोनामुळे सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याचा नित्याचा भाग होत असतानाच दुसरीकडे या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे […]

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन
पश्चिम महाराष्ट्र बातमी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. सातारा येथे सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (४ जानेवारी) उंडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विलासकाका उंडाळकर हे ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे […]

धक्कादायक ! सैन्यदलातील जवानाचा पत्नीनेच केला खून; तिघांना अटक
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! सैन्यदलातील जवानाचा पत्नीनेच केला खून; तिघांना अटक

वाई : सैन्यदलातील जवानाचा खून केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील सैदापूर गावात घडली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानाचा मारहाण करून खून केल्याप्रकरणी पत्नी, भावजय आणि मेहुणा यांना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. संदीप जयसिंग पवार हा भारतीय सैन्यदलातील जवान सुट्टीवर घरी आलेला असताना दारू पिऊन मारहाण करून व त्रास देत होता. त्रासाला […]