नगर : साईभक्तांसाठी एक मोठी खूशखबर असून शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मात्र, भक्तांनी दर्शनाला येताना ऑनलाइन पास घेऊनच यावे, असेही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्री साईबाबा मंदिरात २५ , २६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या […]
पश्चिम महाराष्ट्र
आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकीवर बहिष्कार
अकलूज : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये करावं, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा, इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते […]
महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द
मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना माहिती दिली आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच […]
धक्कादायक ! कराडमध्ये अन्नातून विषबाधा होऊन सख्ख्या तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तीन मुलींसह आईला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या तिन्ही मुलींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आस्था सासवे (९), […]
ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणाऱ्या डिसले गुरुजींना कोरोनाची लागण
सोलापूर : तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी ही माहिती स्वत-हून व्हॉटसअपवर स्टेटसवर पोस्ट केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव […]
सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका; जिंकला सर्वोत्तम पुरस्कार
सोलापूर : सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात आपला डंका वाजवला असून युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी निवड होणारे ते पहिले भारतिय शिक्षक आहेत. सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी […]
आटपाडीत मोदीसाठी लागली लाखोंची बोली; पण…
सांगली : आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात ‘मोदी’ नावाच्या बकऱ्याला ७० लाखांची बोली लागली आहे. आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता. या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे […]