कोरोना इम्पॅक्ट

‘या’ लशीचे तीन डोस आणि ‘ओमिक्रॉन’चाही खात्मा!

गेली जवळपास दोन वर्ष जगभरात करोनानं धुमाकूळ घालणाऱ्या करोनाला संपूर्णत: मात देण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मात्र, याच दरम्यान सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ स्वरुपानं आणखीनच खळबळ उडवून दिली. सर्वप्रथम ‘ओमिक्रॉन’विरुद्ध वापरात असलेल्या करोना लशींचा फायदा होणार का? कितपत होणार? कोणत्या लशी ओमिक्रॉनविरुद्ध सर्वात शक्तीशाली ठरतील? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, या प्रश्नावरही इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इस्राईलच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात, ‘पी फायझर-बायोएनटेक’निर्मित करोना लसीचे तीन डोस करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटविरुद्ध सुरक्षा देण्यासाठी १०० टक्क्यांपर्यंत सुरक्षित असल्याचं म्हटलं गेलंय.

शेबा वैद्यकीय केंद्र आणि आरोग्य मंत्रालयाची सेंट्रल व्हायरलॉजी लॅब यांनी मिळून हे संशोधन केलंय. यासाठी संशोधकांनी ५-६ महिन्यांपूर्वी करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या २० जणांच्या रक्ताची तुलना अशा लोकांशी केली ज्यांनी जवळपास एका महिन्यापूर्वी लसीचा ‘बुस्टर डोस’ घेतलेला आहे.

‘डेलीमेल’च्या वृत्तानुसार, अहवालात शेबातील संसर्गजन्य रोग युनिटचे संचालक गिली रेगेव-योचाई यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ज्या व्यक्तींनी पाच – सहा महिन्यांपूर्वी करोना लसीचा दुसरा डोस घेतला होता अशा व्यक्तींमध्ये ‘ओमिक्रॉन’ विरूद्ध कोणतंही संरक्षण आढळून आलं नाही. मात्र, या व्यक्तींमध्ये काही प्रमाणात करोनाच्या ‘डेल्टा’ स्वरुपात संरक्षण दिसून आलं.

मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तींनी करोना लशीचा ‘बुस्टर डोस’ घेतलेला होता त्यांच्यात जवळजवळ १०० पटींनी अधिक सुरक्षा वाढू शकते, असं दिसून आलं. करोना लशीचा ‘बुस्टर डोस’ ओमिक्रॉनविरूद्ध संरक्षण देण्यासाठी सक्षम आहे.

रेगेव-योचाई यांच्या म्हणण्यानुसार, बुस्टर डोस ‘डेल्टा’ स्वरुपापेक्षा ‘ओमिक्रॉन’पासून बचाव करण्यासाठी कमी प्रभावी आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनला तटस्थ करण्याची क्षमता चारपट कमी आहे, असे ते म्हणाले. याआधी, फायझर आणि बायोएनटेक यांनीही दावा केला होता की त्यांचे बूस्टर डोस नवीन प्रकार थांबवण्यासाठी प्रभावी आहेत. इस्त्रायली टीमने सांगितले की त्यांनी वास्तविक व्हायरसवर संशोधन केले आहे. कंपन्यांनी ‘स्यूडोव्हायरस’ वर काम केले आहे जे ओमिक्रॉनचे हॉलमार्क उत्परिवर्तन करण्यासाठी बायो-इंजिनियर केलेले होते.

यापूर्वी, ‘पी फायझर’ आणि ‘बायोएनटेक’ या कंपन्यांनीही आपल्या करोना लशीचे बुस्टर डोस ओमिक्रॉनला रोखण्यासाठी प्रभावी असल्याचं सांगितलं होतं. इस्त्रायली संशोधकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वास्तविक विषाणूवर हे संशोधन केलंय. कंपन्यांनी मात्र ‘स्यूडोव्हायरस’ वर काम केलं होतं. हे ‘स्यूडोव्हायरस’ ओमिक्रॉनच्या हॉलमार्क म्युटेशनसाठी ‘बायो-इंजिनियर’ करण्यात आलं होतं. करोना लसीचे दोन डोस घेऊन पाच – सहा महिने झाले असतील तर ‘बुस्टर डोस’ घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.