Coronavirus-12
कोरोना इम्पॅक्ट

तब्बल 28 दिवस कोरोना व्हायरस राहतो जिवंत; वाचा कोणत्या वस्तूंवर…

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे आता जगभरातून यावर लस निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ‘नॅशनल सायन्स एजेंसी सीएसआयआरओ’ ने कोरोना व्हायरसबाबत नवी माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना व्हायरस हा एका नियंत्रित वातावरणात अधिक वेळेपर्यंत संक्रमित होत असतो. हे स्टडी वायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलं आहे. तसेच 20 डिग्री सेल्सिअसवर SARS-COV-2 व्हायरस मोबाईल फोन स्क्रीन, नोट्स आणि काच यांसारख्या चिकट स्तरावर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे सीएसआयआरओच्या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हात धुणे, सॅनिटायजिंग आणि व्हायरसच्या संपर्कात आल्यास सतत स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. कोरोना व्हायरस जवळपास एक महिना जिवंत राहतो. त्यामुळे याच्या संक्रमणाचा धोका सुमारे एक महिना असतो.

दरम्यान, कोरोना व्हायरस थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहतो. तसेच चिकट आणि प्लास्टिकच्या वस्तूंवर जास्त काळ कोरोनाचा व्हायरस जिवंत राहतो, असेही अभ्यासातून समोर आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत