Corona-Vaccine
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनावरील लस आली बाजारात तेही चीनच्याच; पण…

बीजिंग : कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात झाला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर लस निर्मितीसाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता याच संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पूर्व चीनमधील एका शहरात चाचणीशिवाय प्रयोग म्हणून कोरोनाची बाधा होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी लस विक्री सुरू करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीनमध्ये आपात्कालीन लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेंतर्गत 60 डॉलरमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजे भारतीय मूल्यानुसार याचा विचार केला तर ही लस सुमारे 6400 रुपयांपर्यंत मिळू शकेल. बीजिंगमधील सिनोवॅक बायोटेक कंपनीकडून ही लस निर्मिती केली गेली आहे.

सिनोवॅक बायोटेक कंपनीकडून विकसित केलेली सिनोवॅकची ही लस पूर्व चीन भागातील झेजियांग प्रातांतील काही लोकांना खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लशीच्या प्रयोगानंतर सर्वसामान्य जनतेला लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अधिकृत परवानगी नाहीच

सिनोवॅक या लशीला अधिकृतपणे मार्केटिंग करण्यास परवानगी मिळाली नाही. ही लस फक्त आपात्कालीन परिस्थितीत वापरासाठी या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत