पुन्हा कोरोनाचा कहर; ‘या’ शहरात लॉकडाऊन, प्रवासी निर्बंध
कोरोना इम्पॅक्ट

पुन्हा कोरोनाचा कहर; ‘या’ शहरात लॉकडाऊन, प्रवासी निर्बंध

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. याठिकाणी अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढू लागलीय. एवढंच नाही तर बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर चीन सरकारनं अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये (China Covid Cases) मोठी वाढ झालीय. बुधवारी कोविड प्रकरणं 31,454 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनची ही सर्वोच्च पातळी आहे. दरम्यान, अॅपल प्लांटमध्ये कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांत झालेल्या संघर्षानंतर झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन (Zhengzhou lockdown) लागू करण्यात आलं आहे.

चीनच्या नॅशनल हेल्थ ब्युरोच्या आकडेवारीनं हा धक्का दिलाय. एकाच दिवसांत अनेक प्रकरणं समोर आल्यानं लॉकडाऊन, प्रवासी निर्बंध लादण्याबरोबरच चीन सरकार कोरोनाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी चाचणी आणि लसीकरण देखील तीव्र करत आहे.

बीजिंगमध्ये लॉकडाऊन, कडक निर्बंध
राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उद्यानं, कार्यालयीन इमारती आणि शॉपिंग मॉल्स बंद करण्यात आले आहेत. बीजिंगमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला चाओयांग जिल्हा जवळपास पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. बीजिंगमधील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र बनलेल्या चाओयांग जिल्ह्यातील सुमारे 35 लाख रहिवाशांना आरोग्य अधिकार्‍यांनी विषाणूपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय.