अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला

नवी दिल्ली : फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशी टीका ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केली होती. त्यानंतर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनीदेखील पूनावाला यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ”लसीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे. आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे लशीच्या चाचण्या केल्या असूनही आमच्यावर टीका करण्यात येते” असे डॉ. कृष्णा इल्ला यांनी म्हंटले होते. या मुले दोन्ही कंपन्यामचे चांगलीच जुंपली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र आज अखेर या वादावर पदडा पडला आहे. कोरोना लसीच्या परिणामकारकतेच्या मुद्यावरुन सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या प्रमुखांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर आता दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. लस उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही कंपन्यांनी बोलून दाखवला आहे.

“भारतातील तसेच जगातील लोकांचे प्राण आणि उपजीविका वाचवणे सध्याच्या घडीला महत्त्वाचे लक्ष्य आहे. लसीमध्ये लोकांचे प्राण वाचवण्याची तसेच अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याची ताकत आहे” असे अदर पूनावाला आणि डॉ. कृष्णा इल्ला यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तसेच, जनतेला चांगल्या दर्जाची, सुरक्षित आणि परिणामकारक लस उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. लसीचे उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर लक्ष केंद्रीत करणार आहोत” असे सिरम आणि भारत बायोटेकने म्हटले आहे.

दरम्यान, औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम भारतात सुरू होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. सांगितले. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठे लसीकरण भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचा सिंहाचा वाटा आहे.