गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून त्यानुसार देशातील ३० कोटी जनतेला लस देण्यात येईल. त्याचबरोबर, यासाठी टास्कफोर्स नेमण्यात आले असून मोहिमेसाठी हजारो लोकांना देशभरात प्रशिक्षण दिलं गेलं आहे. सध्या राज्य स्तरावर प्रशिक्षण मोहिम सुरु असून याअंतर्गत २६० जिल्ह्यांमधून २०,००० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

यामध्ये आरोग्य कर्मचारी, करोना काळात लढणारे आघाडीचे कर्मचारी जसे पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी, ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसेच ५० वयापेक्षा कमी असलेल्या पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती या लोकांचा या प्राधान्यक्रमामध्ये समावेश असेल.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले की, पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य होते. त्याप्रमाणेच शेवटी करोनाचा संसर्ग देखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल, असा विश्वासही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला. आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंध लस मिळावी. लसीच्या अनिश्चिततेबाबत निर्माण झालेल्या अडचणीबाबत आम्ही माहिती देत राहू. पण जर एखाद्याने ठरवलं की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला जबरदस्ती करु शकत नाही, असंही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तसेच, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि आयसीएमआर निर्मित कोवाक्सिन (Covaxin) लस तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपत्कालीन उपयोगासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे.

ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्ड (Covishield) आहे, ज्याची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा चालू असून अंतिम टप्प्यात आहे. दक्षिण आवृत्तीसाठी, भारताच्या ड्रग रेगुलेटर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.