आरोग्यमंत्र्यांचा इशारा; ब्रिटन, अमेरिका व युरोपसारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर…
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांचा इशारा; ब्रिटन, अमेरिका व युरोपसारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर…

औरंगाबाद : ”राज्यात ब्रिटनच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या रुग्णाची नोंद झाली नाही. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेंनचा पॉझिटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलताना ते म्हणाले की, या नवीन विषाणूचा परदेशातील कहर पाहता हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कारण होता कामा नये. त्या दृष्टीने नागरिकांनी न घाबरता सुरक्षिततेच्या सर्व नियमाचे पालन करत आपला वावर ठेवला पाहिजे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर रुग्णांचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला तर जाब विचारला जाईल. असा इशाराही राजेश टोपे यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की, देशात UKच्या फ्लाईट्स थांबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. सगळ्या प्रवाश्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करत आहोत. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही सावध असणे आवश्यक आहे. नव्या कोरोनाचा संसर्गाचा वेग 70% जास्त आहे. त्यामुळे संसर्ग अधिक गतीने होऊ शकतो. ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कडक लॉकडाऊन होऊ नये असे वाटत असेल तर यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी.

तथापि, सध्याच्या तपासणीत सध्या तरी महाराष्ट्रातील एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, भविष्यात महाराष्ट्रात मिळणारच नाही असे खात्रीलायक सांगता येत नाही. सध्या जे रुग्ण सापडले आहेत ते भारतातील विविध भागातील आहे. या नवीन विषाणूचा शिरकाव भारतात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने तात्काळ पाऊले उचलून ब्रिटन होऊन येणाऱ्या विमानांना प्रवेश बंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र, बंदी करण्याच्या आदल्या दिवशी येणाऱ्या काही प्रवाशाच्या तपासणीत हा नवीन विषाणू 6 प्रवाशांच्या नमुने तपासणीत आढळून आला आहे. तर अजून काही नमुन्यांची तपासणी सुरूच आहे. असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.