आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या शंका दूर केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजेश टोपे म्हणाले की, ”भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोव्हॅक्सीन लस घेण्यास नकार दिला जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याने लस घेतली की मी घेतो, अशी मानसिकता दिसून येत आहे. मात्र, त्यांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे लस सुरक्षित असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचेल.

मुंबईचे जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र आहे. जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मंगळवारी याठिकाणी 100 जणांना लस देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ रुग्णालयातील 13 आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा टोपे यांनी माझी वेळ आल्यावर मी लस घेईन, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत: त्यासाठी पुढाकार घेईन. पण सध्याच्या नियमांनुसार आमचा टर्न नंतर आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचे ठरवल्याचे टोपे यांनी सांगितले.