तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घेण्याआधी ‘हे’ वाचा
कोरोना इम्पॅक्ट

तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घेण्याआधी ‘हे’ वाचा

ओटावा : ”ब्रिटनमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट आढळले त्यांना औषधांची अ‍ॅलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना औषध किंवा कुठल्याही खाद्य पदार्थ्यांची अ‍ॅलर्जी असेल, त्यांनी फायजर कंपनीची लस घेऊ नये,” असे आवाहन कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक जारी करत नागरिकांना लसीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

परिपत्रकातील माहितीनुसार, कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या अमेरिकेच्या फायजर कंपनीने मागील काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही नागरिकांना अ‍ॅलर्जीचा त्रास होत असल्याचं समोर आलं. यानंतर फायजरने ज्या नागरिकांना खाद्य पदार्थ किंवा लसीची अ‍ॅलर्जीची पार्श्वभूमी आहे त्यांना ही लस न देण्याचा सल्ला दिला आहे.”

तथापि, कोरोनाच्या या लसींमुळे जग कोरोनावर मात करु शकते अशी आशा तयार झाली होती. मात्र, कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांकडे पाहता चिंता वाढली आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने उपलब्ध पुराव्यांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार सध्याचे आरोग्यविषयक गाईडलाईन्स योग्य आहेत, अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. जर लसीबाबत काही नवी तक्रार आढळल्यास योग्य निर्णय घेण्यात येईल”, असं पत्रकात म्हटलं आहे. ज्या लोकांना एलर्जीची समस्या आहे त्यांनी औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंदेखील पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, फायजरची लस एमआरएनए’ वर आधारित आहे. एमआरएनए लस मानवी शरीरात इंजेक्ट केली जाते. ही लस शरीरातील इम्यून सिस्टमला कोरोना विषाणूशी लडण्यासाठी तयार करते. या लसीमुळे अँटीबॉडी तयार होतात आणि टी-सेल सक्रीय होऊन संसर्ग झालेल्या सेल नष्ट करण्याचं काम करतात. फायजरने 40 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांना 3 टप्प्यातील चाचणीत सहभागी करुन घेतलं होतं.

फायजर लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अनेक देशांनी परवानगी दिली आहे.
मात्र, एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीतही काही प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांना लस घेतल्यानंतर इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी त्रास झाल्याचं समोर आलं होतं. तसेच, या लसीच्या सुरुवातीच्या चाचणीत 4 जणांना ‘बेल्स पाल्सी’ (अर्धांगवायू/पॅरालिसीस) झाल्याचं समोर आलं होतं. या अवस्थेत अर्ध्या चेहऱ्याचे स्नायू निकामी होतात. असं असलं तरी हे अगदी काही वेळेसाठी होतं आणि पुन्हा शरीर सामान्य होतं. हे कशामुळे होतं याचं अद्याप निश्चित कारण समजू शकलेलं नाही. सर्व डॉक्टरांना लसीकरणानंतर काय दुष्परिणाम होतात याचं निरिक्षण करण्यास सांगितलं आहे.