कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी करत भारताने मारली बाजी
कोरोना इम्पॅक्ट

कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी करत भारताने मारली बाजी

भारताने आतापर्यंत कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी केली आहे. कोरोना व्हायरसच्या लसीच्या डोसची नोंदणी करण्यात भारताने जगात पहिला क्रमांक मिळवला आहे. भारतात ऑक्सफोर्डच्या लसीचा सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्रेजेनिकप्रमाणे क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत. त्यामुळे सर्वात जास्त ऑक्‍सफर्ड-एस्‍ट्राजेनेकाच्या वॅक्सिनची मागणी करण्यात येत आहे. अनेक देशांनी या लसीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारत आणि अमेरिकेने या वॅक्सिनचे 50-50 कोटी डोस बुक केले आहेत. याव्यतिरिक्त नोवावॅक्‍सच्या वॅक्सिनचे 120 कोटी डोस आतापर्यंत बुक करण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ड्यूक युनिवर्सिटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, जगभरात लसीच्या ऑर्डरवर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत युरोपियन युनियनने 158 कोटी आणि अमेरिकेने 100 कोटींहून अधिक कोरोना लसींची नोंदणी केली आहे. जर या लसी चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्या, तर यांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरच लोकांना लसीचा डोस देण्यास सुरुवात करण्यात येईल.

त्याचबरोबर, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं की, भारत जुलै-ऑगस्ट 2021 पर्यंत 50 कोटी डोस मिळवण्यासाठी वॅक्सिन निर्मात्यांच्या संपर्कात आहेत. ड्यूक युनिवर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियाच्या कोरोनावरील लस स्पूटनिक व्ही चे 10 कोटी डोस आणि नोवावॅक्सच्या लसीचे 100 कोटी डोसचा करार केला आहे.

दरम्यान, आरडीआयएफने सांगितल्यानुसार, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भारतातही रशियाच्या स्पूटनिक व्ही चे 100 मिलियन डोसचं वार्षिक उत्पादन करणार आहे. रशियन डायरेक्टर इन्वेस्टमेंट फंड (आरडीआईएफ) आणि हैदराबादची कंपनी हेटेरो बॉयोफार्मामध्ये यांच्यात याबाबत करार होणार आहे. या करारानुसार, 2021 च्या सुरुवातीमध्ये वॅक्सिनचं उत्पादन सुरु करण्याचं त्यांचा हेतू आहे. रशियन लस Sputnik V च्या हवाल्याने दावा करण्यात आला होता की, त्यांना तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीमध्ये 91.4 टक्के परिमाण दाखवण्यात आला आहे.