कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : ”कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस दिली जाणार आहे. प्रथम श्रेणीत डॉक्टर्स, पोलीस आणि कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार आहे. यावर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकारचं असून प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग सुरु झाल्याने राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्ट खुलासा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगभरात विविध कंपन्याची कोरोना लस पहिल्यांदा बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी लॉबिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आपलं आणि कुटुबीयांची नावं समाविष्ट करण्यासाठी राजकारणी आणि काही अधिकारी दबाव टाकत आहेत, अशी माहिती जिल्हा व नागरी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फक्त आत्ताच नाही तर सीरम-ऑक्सफोर्ड लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतरही आम्हाला अनेक कॉल आले. फक्त राजकारण्यांकडूनच नाही तर पुष्कळ आयपीएस अधिकाऱ्यांनीही लसीचा डोस सर्वांच्या आधी मिळावा यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी व्हायचं होतं. मात्र कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.

प्रथम श्रेणीत लस देण्यात यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केल्याची चर्चा आहे. मात्र, अशी कुणीही मागणी केलेली नसून कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत डॉक्टर्स, पोलीस आणि कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार आहे. यावर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकारचं असून प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.