पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती
कोरोना इम्पॅक्ट

पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती

पुणे : महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी राज्यसरकारकडे महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातील कोरोना स्थितीविषयी सकाळी पालकमंत्री अजित पवार, मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काऊन्सिल हॉल येथे बैठक झाली. त्यानंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून चिंतेचं वातावरण असताना पुण्यात मात्र कोरोनासंदर्भात कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. याउलट कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला. कोरोना संसर्ग सर्वाधिक वेगानं वाढत असल्यानं लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावं, अशी मागणी केली.

आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण दिल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला दिल्याचं राव यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुण्यात शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. तसंच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांना यामध्ये मुभा असणार आहे. हॉटेल, रेस्तराँ रात्री १० नंतर बंद असतील. दरम्यान त्यांना ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच रात्री १० नंतर एका तासासाठी हॉटेल, रेस्तरॉ यांना होम डिलिव्हरीची परवानगी आहे,” अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

असे आहेत कोरोना प्रतिबंधक निर्बंध
पुण्यातील शाळा – महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट
हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरु राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल.                    पुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद
रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार नियंत्रण
एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येणार                                                                                                            त्याचबरोबर एकुण आसनक्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना परवनगी
लग्न समारंभ , धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम , अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी
नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई
थिएटर, मॉल्स आणि दुकानं दहा वाजेपर्यंत सुरु राहतील.