चौथ्या लाटेत करोनाची रूग्णसंख्या कमी पण मृत्यूचे प्रमाण भयंकर, ‘ही’ 8 विचित्र लक्षणे दीर्घकाळ घालत आहेत धुमाकूळ
कोरोना इम्पॅक्ट

चौथ्या लाटेत करोनाची रूग्णसंख्या कमी पण मृत्यूचे प्रमाण भयंकर, ‘ही’ 8 विचित्र लक्षणे दीर्घकाळ घालत आहेत धुमाकूळ

कोरोना व्हायरसने (Coronavirus pandemic) पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18,930 नवीन रुग्ण आढळले असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 4.32% च्या डेली पॉझिटिव्ह रेट सोबतच एकूण अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या वाढून 1,19,457 झाली आहे. याकडे कोरोनाची चौथी लाट (covid19 4th wave) म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर नऊ महिन्यांवरून कमी करुन सहा महिने केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना व्हायरस झपाट्याने त्याचे स्वरूप बदलत आहे आणि प्रत्येक बदलत्या प्रकारामुळे कोरोनाची लक्षणेही झपाट्याने बदलत आहेत. आता फक्त ताप किंवा खोकला ही कोरोनाची लक्षणे राहिलेली नाहीत. कोरोनाचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होत आहे. हा प्राणघातक विषाणू शरीरात अनेक आठवडे किंवा महिने राहू शकतो. यामुळेच काही रुग्णांना बरे झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षांनंतरही लॉंग कोविड लक्षणांचा सामना करावा लागत आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

कोविड टोएज (COVID toes)
यामध्ये पायाला आणि पायाच्या बोटांना विचित्र प्रकारे सूज आलेली दिसते. याला कोविड टोज म्हणतात आणि त्याची लक्षणे हात, मनगट आणि घोट्यासारख्या इतर भागात देखील दिसू शकतात. त्यामुळे बोटांच्या सूजेकडे दुर्लक्ष करू नका. या लक्षणांव्यतिरिक्त, आपण वास किंवा चव घेण्याची क्षमता कमी होणे, पोटाशी संबंधित समस्या, केस गळणे इत्यादी लक्षणांकडे देखील दुर्लक्ष करू नये कारण ही लक्षणे आपल्याला दीर्घकाळ त्रास देऊ शकतात.

डोळे गुलाबी होणे (Pink eye)
गुलाबी डोळे किंवा डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागावर होणारा दाह म्हणजेच नेत्रश्लेष्मलाशोथ कोरोना रुग्णांमध्ये दिसून आला. संशोधकांना असे आढळून आले आहे की कोरोनामुळे रुग्णांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक लक्षणे दिसून येत आहेत जसे की, प्रकाशाचा त्रास होणे, डोळे दुखणे, डोळ्यांत पाणी येणे आणि डोळे लाल होणे.

त्वचेवर रॅशेज (Skin rash)
कोरोनाच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे किंवा रॅशेज येणे देखील समाविष्ट आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर रुग्णांनी अंगावर उठणा-या पित्ताच्या गाठी आणि त्वचेचा रंग बदल्याची लक्षणे दिसून आल्याचं सांगितलं. त्वचेवरील रॅशेज अनेकदा शरीराच्या इतर भागांना संक्रमित करतात आणि उपचार न केल्यास ते आसपासच्या इतर लोकांना देखील प्रभावित करू शकतात.

अनियमित हृदयाचे ठोके (​Irregular heartbeat)
ऑक्सिजनची कमतरता आणि हृदयाची सूज यासारख्या अनेक कारणांमुळे हृदयावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. हे प्रामुख्याने कोरोना रुग्णांमध्ये दिसून येते. यामध्ये रुग्णांचे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. ही समस्या काहीच दिवसांत आपोआप बरी होईल या गैरसमजात चुकूनही राहू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

छातीत वेदना (Chest pain)
कोरोनानंतर अनेक रुग्णांमध्ये छातीत दुखण्याचे लक्षण दिसून आले आहे. अनेकांना कोरोना रिकव्हरी अवस्थेपासून ते काही महिन्यांपर्यंत छातीत दुखण्याची समस्या जाणवली. इतर अनेकांमध्ये संसर्ग काही आठवड्यांनंतर सुरू होतो. जर तुम्हाला छातीत विचित्र वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.