नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; कोरोनासंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता
कोरोना इम्पॅक्ट

नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; कोरोनासंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वार ही बैठक होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, इतर राज्यातील परिस्थितीही चिंताजनक होताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्वभूमीवर प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह इतर राज्यात केंद्रीय पथकं पाठवली असून, आज पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभरात पुन्हा चिंतेचे ढग दाटून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानंतर मंगळवारी (१६ मार्च) राज्यात १७ हजार रुग्ण आढळून आले. तर ८७ जणांचा मृत्यू झाला.

तर, दुसरीकडे देशातील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढू लागला आहे. इतर राज्यातही कोरोनाचा उद्रेक होत असल्यानं पंतप्रधानांनी तातडीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत तब्बल २८ हजार ९०३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ हजार ७४१ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याच कालावधीत देशात १८८ जणांचा मृत्यू झाला म्हटलं आहे.

तर पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असून ७९.७३ टक्के इतका सकारात्मकता दर २४ तासात दिसून आला. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुजरात सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांमधील संचारबंदीच्या कालावधीत आणखी दोन तासांनी वाढ केली आहे. हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.