कोरोना इम्पॅक्ट

टेन्शन वाढले! ‘त्या’ देशांमधून आलेले आणखी ४ जण आढळले करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्लीः करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनचा धोका वाढला असताना भारतानेही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व खबरदारी घेतली आहे. आता दिल्ली विमानतळावरून ताजी माहिती येत आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी ४ जण करोना पॉझिटिव्ह ( omicron india ) आढळून आले आहेत, अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. भारताने ओमिक्रॉनचा संसर्ग असलेल्या धोकादायक देशांची यादी जारी केली. यात दक्षिण आफ्रिकेसह यूरोपातील देशांचा समावेश आहे. आता ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग असलेल्या धोकादायत देशांमधून आलेले ४ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे टेन्शन वाढलं आहे.

नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली लोकसभेत माहिती

नागरी हवाई विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत माहिती दिली. ११ देशांना धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. खासकरून धोकादायक श्रेणीत असलेल्या प्रवाशांची कसून तापसणी केली जात आहे, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

दरम्यान, संसदेत करोनाच्या संसर्गाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. विविध राज्यांमध्ये विमानतळावंर वेगवेगळे नियम असल्याने यात एकसुत्रीपणा असावा, यासाठी ही बैठक घेतल्याचं बोललं जातंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published.