कोरोना इम्पॅक्ट

भारतात तिसरी लाट येणार का? omicron च्या धोक्यावर who च्या अधिकाऱ्याने दिले उत्तर

नवी दिल्ली : देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्य दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉन हा अत्यंत संसर्गजन्य आहे. हा वेरियंट आतापर्यंत जगातील ५९ देशांमध्ये पसरला आहे. ओमिक्रॉनमुळे भारतात तिसरी लाट तर येणा नाही ना? अशी चिंता आता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागीय संचालक डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांनी माहिती दिली आहे. नवीन वेरियंटमुळे परिस्थिती गंभीर होईल किंवा चिंताजनक होईल असे नाही. पण नक्कीच परिस्थिती अनिश्चित असेल, असे डॉक्टर खेत्रपाल म्हणाल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

करोना संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. नवीन वेरियंट आल्याने आणि जगातील अनेक देशांमध्ये तो पसरत असल्याने जोखीम वाढली आहे. दक्षिण आशियात आपण हातातील शस्त्र खाली ठेवायला नको. आपल्याला बारकाईने नजर ठेवावी लागेल. देखरेखीची व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपययोजना बळकट करणं सुरूच ठेवलं पाहिजे. लसीकरण वाढवले पाहिजे, असं डॉक्टर पूनम खेत्रपाल म्हणाल्या.

भारतातील ७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. महाराष्ट्रा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, राजस्थान, चंदीगड आणि आंध्र प्रदेशातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन जागतिक स्तरावर पसरणं आणि त्यातील म्युटेशनमुळे आरोग्य सुविधेवर परिणाम होऊ शकतो. आता याचा का परिणाम होईल, हे समजणं अवघड आहे. यामुळे यासंदर्भात स्पष्टता येण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने देशांना अधिकाधिक माहिती सादर करण्यास सांगितलं आहे. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एनडीटीव्हीन हे वृत्त दिलं आहे.

ओमिक्रॉनची संसर्ग क्षमता, गंभीरता, पुन्हा संसर्ग होण्याचा धोका यासह इतर कारणांचा अभ्यास करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी माहिती ही संसर्ग पुन्हा होण्याचा धोका दर्शवत आहे. पण आणखी ठोस निष्कर्षासाठी अधिक माहितीची गरज आहे. पण डेल्टा वेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे गंभीर आजारी होत नाही, याचे काही पुरावे समोर आले आहेत. पण यावर ठोस आणि अधिक बोलणं हे घाईचं ठरू शकतं, असे डॉक्टर पूनम खेत्रपाल म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published.