कोरोना इम्पॅक्ट

पुण्यात धोका वाढला! नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक करोना पॉजिटीव्ह

पिंपरी-चिंचवड: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरला. जगातील १५ देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतात सुद्धा केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळाल्या सुचनेनुसार, ओमायक्रॉन विषाणूला तोंड देण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या लोकांची आर. टी. पी सी. आर. टेस्ट करण्यात येत आहे आणि प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याची पुढील लॅब टेस्ट करण्यात येत आहे. याच तपासणी प्रक्रियेमुळं नायजेरियातून पिंपरी चिंचवाडमध्ये आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालातून समोर आले आहे. आता पुण्यातील एन. आय. व्ही येथे त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून १५ दिवसांपूर्वी पुण्यात आलेली एक व्यक्ती देखील करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे की कसे, याची खातरजमा करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातच आत आणखी दोघे पॉझिटिव्ह आढळ्यानं पुणेकरांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.