Corona Test
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज! भारतात येणार कोरोनावर लस

मॉस्को : कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच अनेक देशांकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. असे असताना आता याच संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

UAE, Second Foreign Country, To Hold Russian Vaccine Sputnik V's Human  Trials – ODISHA BYTES

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ लस भारतात दाखल होणार आहे. भारतात या लशीची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंड आणि डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने चाचणी करण्यास परवानगी मागितली होती. ऑगस्ट महिन्यातच या लशीच्या वापराला राष्ट्रपती पुतीन यांनी मंजुरी दिली होती.

दरम्यान, आता भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीची मानवी चाचणी पार पडणार आहे. या लस चाचणीत 1500 सहभागी असणार असल्याची माहिती रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंडने दिली. ही लस चाचणी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच्या देखरेखीत पार पडणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत