धक्कादायक ! कोरोनाचा अजून एक प्रकार आला समोर; दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यक्तींना संसर्ग
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक ! कोरोनाचा अजून एक प्रकार आला समोर; दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यक्तींना संसर्ग

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जग भयभीत झालं आहे. पहिल्या कोरोना विषाणूच्या आघाताला जगातील काही देश अजूनही सामोरे जात आहेत, तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. मात्र आता हे संकट अजून बळावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, कारण आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं ब्रिटनमध्ये समोर आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान, ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय सध्याच्या घडीला जे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत किंवा दक्षिण आफ्रिकेतील कोणात्याची व्यक्तीच्या संपर्कात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत आले आहेत त्यांनी विलगीकरणाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्हायरसचा हा प्रकार ब्रिटनमध्ये पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. या पार्श्वभूमीवर 10 डाऊनिंग स्ट्रीटला संबोधित करतेवेळी हँकॉक म्हणाले, कोरोनाचे हे दोन्ही नवे प्रकार अशा व्यक्तींमध्ये आढळून आले आहेत, जे मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेहून परतले आहेत. कोरोनाचं हे नवं रुप चिंता वाढवणारं असून, त्यामुळं संसर्ग झपाट्यानं वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.