Rapid-Test
कोरोना इम्पॅक्ट

मोठी बातमी! रॅपिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय? तर पुन्हा होणार चाचणी

नवी दिल्ली : कोरोनाचे निदान समजण्यासाठी आपण जर रॅपिड अँटिजेन टेस्ट केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्वाची. कारण आता या सर्व व्यक्तींची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केली जाणार आहे. याबाबतचे आदेशच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला की नाही हे समजण्यासाठी दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जात आहेत. त्यामध्ये स्वॅब टेस्ट आणि दुसरी रॅपिड अँटिजन टेस्ट. रॅपिड टेस्टचा रिपोर्ट साधारणपणे तासाभरात येतो. कोरोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची यातून शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोणतीही पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारापासून दूर राहू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

रॅपिड टेस्टच्या माध्यमातून निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीची पुन्हा एकदा आरटी-पीसीआरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा आणि राज्यस्तरावर अधिकारी नेमणार

प्रत्येक जिल्हा आणि राज्यस्तरावर अधिकाऱ्यांमार्फत याकडे लक्ष दिले जाणार आहे. निगेटिव्ह आलेली व्यक्तींचा तपशील मागवून त्यांची पुन्हा तपासणी करण्याचा विचार केला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत