मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा
मनोरंजन

मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युवा वॉरियर्स अभियानात बोलताना त्यांनी भेशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं सांगितलं. तसंच आपला सगळ्या मुस्लिलांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं सांगितलं. मात्र काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

मोदींनी मुस्लिम समाजतल्या महिलांच्या पायातली बेडी तोडली. तीन तलाकचा कायदा रद्द केला. बिहारच्या विजयाच्या विश्लेशन केलं तर लक्षात येईल की बिहारच्या मुस्लिम महिलांनी मोदींना रांगेनं मतदान केलं. तसेच, बिहारमध्ये मुस्लिम मॅजॉरिटी असलेला सीमांतमध्ये 29 पैकी 14 जागा भाजपला मिळाल्या. याच भागातल्या महिलांनी आपापल्या नवऱ्यांना सांगितलं. तुमको क्या करना है करो हमको मोदीजी को मतदान करना हैं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.