लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो
मनोरंजन

लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो

मुंबई: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने लग्न केलं आहे. त्याला टी-20 आणि वन-डे सीरिजमधून आराम देण्यात आला असून बुमराह आणि संजनाचे लग्नसमारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता लग्नानंतरचे क्युट फोटो आता खुद्द बुमराहने शेअर केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजनानं लग्नाआधीचे आणि लग्नातील विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अगदी संगीत सेरेमनीत बुमराह आणि संजनानं केलेल्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा क्युट फोटोनं चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. या फोटोमध्ये संजना खूपच सुंदर दिसत आहे.

बुमराहने ब्लेझर घातलं आहे तर संजनानं जांभळ्या रंगाचा खूप सुंदर ड्रेस घातला आहे.