मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीला धक्का; स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचे निधन

यंदाचे 2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी आणि मराठीचित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरले आहे. अनेक कलाकारांच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत प्रशांतने अब्दुल्ला दळवी ही भूमिका साकारली होती. 14 सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अशा जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत त्याने बाजी घोरपडे ही भूमिका साकारली होती. स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांची निर्मिती करणाऱ्या ‘जगदंब क्रिएशन्स’च्या इन्स्टाग्राम पेजवर प्रशांतचा फोटो पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत