ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड

मुंबई : झपाटलेला चित्रपटात ओम फट् स्वाहा हा मृत्युंजय मंत्र देणाऱ्या बाबाची भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राघवेंद्र यांनी ब्लक अँड व्हाईट, गौरी, सखी, कुठे शोधू मी तिला या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर छोडो कल की बात या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

राघवेंद्र यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती.