मनोरंजन

अभिनेत्री पायल घोषचे दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप; अनुरागकडून मात्र आरोपांचे खंडन

मुंबई : ”मला शांत करण्याच्या प्रयत्नात इतके खोटे बोललात की तुम्ही एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढचं म्हणेल की, तुमचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” असे स्पष्टीकरण देत दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभिनेत्री पायाल घोषचे आरोप फेटाळून लावले आहेत. पायल घोषने अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर अनुराग कश्यपने ट्वीट करत तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेत्री पायल घोषनं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं ट्वीट करून खंडन केलं आहे.एकापाठोपाठ एक ट्वीट करत त्याने आपल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ट्वीट करत अनुराग कश्यप म्हणाला की, ”मॅडम माझे दोन विवाह झाले आहेत, जर दोन विवाह करणे गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मी खूप प्रेम केले आहे, हे देखील मी मान्य करतो. माझी पहिली पत्नी असो किंवा दुसरी. तसेच ज्या अभिनेत्रींसोबत मी काम केले आहे किंवा माझ्या टीममध्ये काम करणाऱ्या महिला.

तो पुढे म्हणाला की, “कोणत्याच महिलेसोबत मी गैरवर्तन केले नाही आणि त्याचे समर्थन देखील करत नाही. तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर खर काय आहे ते कळते. तुम्हाल खूप प्रेम आणि आशिर्वाद. बाकी तुमच्या इंग्रजीचे उत्तर हिंदीमध्ये दिले याबद्दल माफी. ही तर सुरूवात आहे.अजून बरेच हल्ले होणार आहे. भरपूर फोन आले की, काही बोलू नको,मला शांत राहण्याचा सल्ला दिला. माहीत नाही कधी कोण कशापद्धतीने माझ्यावर टीका करेल” असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पायलने घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करत ट्वीट केले होते. ” दिग्दर्शक अनुर्ग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली. कृपा करून मला त्याच्याविरोधात कारवाई केली जावी. तसेच त्याचा सर्जनशील चेहऱ्यामागे दडलेला राक्षसी चेहरा सर्वांसमोर आणावा. मला माहित आहे यामुळे माझ्या सुरक्षिततेस धोका निर्मा होऊ शकतो. पण कृपा करून मदत करावी.” ट्वीटच्या शेवटी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील टॅग केले आहे. मात्र याला उत्तर देत अनुराग कश्यपने सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत