मुंबई – टीव्ही अभिनेत्री प्रिती तलरेजा हिने तिचा नवरा अभिजीत पेटकर याच्यावर तिने खळबळजनक आरोप केले आहेत. यासोबतच प्रितीने त्याच्याविरूद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. प्रितीने दिलेल्या जबाबानुसार तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. जेव्हा तिने धर्मांतर करण्यास नकार दिला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
घरगुती हिंसाचाराबद्दल प्रीतीने सोशल मीडियावर अनेक ट्वीट केले आहेत. यापूर्वी तिने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती पण अभिजीत विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ यांना टॅग करून यासंबंधी मदत करण्याची विनंतीही केली होती. या प्रकरणात मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता खडकपाडा कल्याण पोलिसांनी प्रितीच्या तक्रारीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
UPDATE ON @preitytalreja's CASE:
FIR has been filed against Abhijeet Petkar (Converted to Islam) last evening at Khadakpada Police Station, Kalyan.
Thanks to @Dev_Fadnavis Dada & @KiritSomaiya Bhai for all the support 🙏 pic.twitter.com/EAqpt0HXwo
— Sunaina Holey (@SunainaHoley) January 6, 2021
प्रीती तलरेजाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले. यात तिच्या चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. प्रितीच्या एफआयआरची एक प्रत सुनैना होले यांनी शेअर केली आहे. तसंच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सौमैया यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.
He says he's a muslim but has no documents of conversion and applies his name as abhijeet petkar
In his legal documents has been fooling me in the name of love since 3 years is it a mistake Loving and trusting someone for better future? @PMOIndia @CMOMaharashtra @ThaneCityPolice— Preity talreja (@preitytalreja) January 1, 2021
एका ट्विटमध्ये प्रितीने लिहिले की तिचा नवरा अभिजीत याने तो मुस्लिम असल्याचं सांगितलं. पण त्याच्याकडे धर्मांतर केल्याचे कोणतेही कागदपत्र नाही. तो त्याच्या कागदपत्रांवर अभिजित पेटकर हेच नाव लिहितो. तीन वर्षांपासून तो प्रेमाच्या नावाखाली तिची फसवणूक करत आहे. दरम्यान, प्रिती तलरेजा ही टीव्ही मालिका कृष्णादासीमध्ये दिसली होती.