तालिबानच्या गोळीबारात अभिनेत्रीचे ४ नातेवाईक ठार
मनोरंजन

तालिबानच्या गोळीबारात अभिनेत्रीचे ४ नातेवाईक ठार

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पाकिस्तानी-अफगाण वंशाची अभिनेत्री मलिशा हिना खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात काही नातेवाईकांना गमावले असल्याचे सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मलिशा हिना खानने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझे कुटुंबीय आणि मी फार कठीण काळातून जात आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही काबूलमधील आमच्या चार नातेवाईकांना गमावले आहे या आशयाचे ट्वीट तिने केले आहे.

सध्या अफगाणिस्तानमध्ये भयानक परिस्थिती पाहायला मिळते. अनेक अफगाणी नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मलिशा गेल्याच वर्षी भारतात आली आहे. ती २०१८मध्ये चर्चेत होती. त्यावेळी तिचे काही न्यूड व्हिडीओ व्हायरल झाले होते.