मनोरंजन

उपचारासाठी अभिनेत्याला हवेत २५ लाख; सलमान, पूजा भट्टसह ६५३लोकांची मदत

अभिनेता फराज खान आजकाल मृत्यूशी झुंज देत आहे. फराज आयसीयूमध्ये आहे. फराजची प्रकृती खूपच खराब आहे. त्याला उपचारासाठी २५ लाख रुपयांची गरज आहे. अभिनेत्री पूजा भट्ट यांनी ट्वीट करून त्याला मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर फराजला अनेकांनी मदत केली आहे.
————-
आणखी वाचा :
अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी हृतिक रोशनचा पुढाकार
————-
मराठी व्याकरणाला तर्कशुद्ध करणारे तर्खडकर
————-
पूजा भट्टने आवाहन केल्यापासून लोकांनी फंड जमा करायला सुरुवात केली. गेल्या तीन दिवसात एकूण १३ लाख १३ हजार रुपये जमा झाले आहेत. हा फंड एकूण ६५३ लोकांनी जमा केला आहे. त्याचबरोबर सलमान खानने फराजच्या मेडिकलचा खर्च उचलला आहे. यावर कश्मीराने मदतीसाठी सलमानचे आभार व्यक्त केले आहेत. कश्मीराने एक पोस्ट लिहत तुम्ही खरंच एक महान व्यक्ती आहात. फराज खान आणि त्यांच्या मेडिकल बिलाची जबाबदारी घेतल्याबद्दल धन्यवाद ! अशा आशयाची पोस्ट कश्मीराने इन्स्टाग्रामवर लिहली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फराज खान ९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून २००० च्या उत्तरार्धात इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध होता. फरेब, पृथ्वी, मेहंदी, ‘दुल्हन बनू मैं तेरी’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘चांद बुज गया’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये फराज दिसला होता. २००२ नंतर फराज यांनी बर्‍याच टीव्ही शोमध्येही काम केले. ३७ वर्षांनंतर’, ‘लिपस्टिक’, ‘सिंदूर तेरे नाम का’,नीली आंखे ” सारख्या शोचा त्याचा समावेश होता.

अभिनयासाठी आयुष्य वेचणाऱ्या फराज खानला आज जगण्यासाठी तुमच्या मदतीची गरज असल्याची पोस्ट पूजा भट्टने ट्विटरवर केली होती. बॉलीवूड अभिनेता युसुफ खान यांचा फराज खान मुलगा आहे. ९० च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटांचा झेबिस्को म्हणून लोकप्रिय होता. चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट पाऊल ठेवण्यासाठी खूप कष्ट केले. १९९८ मध्ये आलेल्या ‘मेहंदी’ चित्रपटात राणी मुखर्जीसोबत तुम्ही सर्वांनी पाहिलेले आठवत असेल. ११९६ मधील त्यांचा ‘फरेब’ हा त्याचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटसृष्टीत त्याकाळात त्याचे खूप कौतुक झाले होते.

जवळपास एक वर्षापासून फराजला खोकला आणि छातीतचा संसर्ग होता. खोकल्यामुळे आजार वाढायला लागला. कोरोनामुळे त्याने व्हिडीओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरविले. ८ ऑक्टोबर २०२० रोजी व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहिली. खोकला तीव्र झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तब्येतीत चढउतार होत आहेत. तो अजूनही आयसीयूमध्ये बेशुद्ध आहे. त्याला आजारातून बरा करण्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत. परंतु त्यासाठी आणखी ७-१० दिवस काळजी घ्यावी लागेल. यासाठी सुमारे २५ लाख रुपयांची गरज होती.

फराजच्या धाकट्या भावाने सांगितले की, “गेल्या एक वर्षापासून फराज खोकला आणि छातीत संक्रमणामुळे आजारी होता. अलीकडेच त्याची प्रकृती खालावली. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. तो विक्रम हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे. हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर त्याला कळले की त्याच्या मेंदूत संसर्ग आहे आणि हर्पिसच्या संसर्गामुळे त्याला सलग तीनवेळा त्रास होता आणि त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली होती. भाई गेल्या पाच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात जगण्याची शक्यता ५०% आहे. उपचार सुरू आहे. पण तो अजूनही बेशुद्ध आहे. पुढील उपचारासाठी आम्हाला २५ लाखांची गरज आहे. त्याने आपल्या बचतीचा बराचसा भाग उपचारावर खर्च केला आणि आता खर्चाची व्यवस्था करणे अवघड होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत