मनोरंजन

शिवसेनेनंतर कंगनाची आता सोनिया गांधीवर संविधानाचा दाखला देत टीका

मुंबई : राज्यसरकारवर निशाणा साधणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतने आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. ”माझ्याविरोधात महाराष्ट्र राज्य सरकारने उचललेल्या या पावलावर सोनिया गांधी काहीच बोलणार नाहीत का?” असा प्रश्न विचारत तिने या सर्व प्रकरणात कॉंग्रेसला ओढण्याचा प्रयत्न केला आहे. एकापाठोपाठ तीन ट्वीट करत तिने सोनिया गांधी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या ट्वीटमध्ये तिने शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत ‘शिवसेनेची स्थिती’ असे लिहित शिवसेनेवर टीका केली आहे. तिने म्हंटले आहे की, ‘माझा आवडत्या आदर्शांपैकी एक महान बाळासाहेब ठाकरे यांना भीती ही होती की, शिवसेना कधीतरी युती करेल आणि कॉंग्रेस होईल. जर त्यांनी आज आपल्या पक्षाची अवस्था पाहिली असती तर त्यांना काय वाटले असते, हे मला जाणून घ्यायचे आहे.”

तर दुसऱ्या ट्वीट मध्ये तिने थेट सोनिया गांधी यांनाच थेट प्रश्न विचारला आहे. कंगनाच्या दुसर्‍या ट्विटमध्ये तिने म्हंटले आहे की, ‘आदरणीय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, महाराष्ट्रात तुमच्या सरकारकडून माझ्यावर झालेल्या या अन्यायावर तुम्हाला राग नाही आला का? डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधांच्या  तत्वांचे पालन करण्यास तुम्ही तुमच्या सरकारला विचारणार नाही का ? असा प्रश्न तिने सोनिया गांधी यांना विचारला आहे.

तर तिने पुढच्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, ”पाश्चिमात्य देशात तुमचा जन्म झाला,पण तुम्ही भारतात वास्तव्य करत आहात. आपल्याला महिलांच्या संघर्षाबद्दल माहिती असलेच. जर तुमच्या सरकारमध्ये महिलांचे शोषण केले जात आहे आणि त्यांची खिल्ली उडवली जात आहे, तेव्हा इतिहास आपल्या शांततेचा आणि उदासिनतेचा न्याय करेल. मला अशा आहे तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप कराल” असेही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत