अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं आहे. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, ती माझं सर्वस्व होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती अशा आशयाचं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.

अक्षय कुमारच्या या ट्वीटनंतर त्याच्या अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल होतं. ही बातमी मिळताच अक्षय कुमार त्वरित लंडन होऊन मुंबई परतला होता. अक्षय कुमार दिग्दर्शक रंजीत तिवारी यांचा आगामी चित्रपट सिंड्रेलाच्या शूटिंगसाठी काही दिवसांपासून लंडनमध्ये होता. मात्र आईच्या प्रकृतीची ठिक नसल्याने तो सोमवारी मुंबईत परतला.